टायझरच्या दालनांची संख्या लवकरच शंभरवर जाणार 

एक वर्षातच टायझर या पुरुषासाठीच्या तयार कपड्याच्या बॅंडने चांगली ओळख मिळविली आहे. पहिल्याच वर्षी 17 जिल्ह्यात 50 हून अधिक दालने ग्राहकांच्या सेवेत रुजू झाली आहेत. कंपनीची तयार कपड्याची उत्पादन क्षमता महिन्याला 35 हजार शर्ट आणि आठ हजार ट्राऊझर इतकी आहे. 
कुणाल मराठे 
मुख्य कार्यकारी अधिकारी, टायझर 
पुणे: भारतात प्रथमच एक वर्षाची गॅरेंटी देणारा खास पुरुषांसाठीचा तयार कपड्यांचा सुयोग्य ब्रॅंड अशी ओळख अल्पावधीतच मिळविलेल्या टायझर या ब्रॅंडच्या दालनांची संख्या नजीकच्या भविष्यात शंभरवर नेण्यात येणार असल्याची घोषणा टायझरचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल मराठे यांनी केली.
टायझरच्या वर्षपूर्तीनिमित्त बोलताना ते म्हणाले की, गेल्या वर्षी 16 ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या टायझरने अल्पावधीतच लक्षणीय प्रगती केली आहे. ब्लेंडेड फॅब्रिक्‍सच्या वापरातून पुरुषांसाठीच्या तयार कपड्यांच्या बाजारपेठेत स्वत:चे एक निश्‍चित असे स्थान त्यांनी निर्माण केले आहे. पहिल्याच वर्षी राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये 50 हून अधिक दालने ग्राहकांच्या सेवेत रुजू झाली आहेत. हीच संख्या लवकरात लवकर 100 वर नेण्याचा आमचा मानस आहे. यामध्ये मुंबई वगळता राज्यभरातील इतर भागांमध्येही 50 दालने उघडण्यात येतील, ज्यामध्ये प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र यांचा समावेश असेल.
अनेकदा असे होते की कपडे हे आरामदायी असतील तर ते वापरण्यास, निगा राखण्यास सोपे नसतात आणि वापरण्यास व निगा राखण्यास सोपे असलेले कपडे हे बऱ्याचदा फारसे आरामदायी नसतात. टायझरने नेमकी हीच बाब लक्षात घेत वापरण्यास सोपे आणि आरामदायी या दोन्ही गुणधर्मांना एकत्र आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आणि हा प्रयत्न ग्राहकांच्या पसंतीस उतरला.
आपल्या उत्पादनांच्या दर्जावर असलेल्या प्रचंड विश्वासामुळे टायझरने भारतात प्रथमच खरेदी केल्यापासून एक वर्षाच्या आत कोणतीही उत्पादकीय त्रुटी आढळल्यास ते कपडे विनाअट व कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता बदलून दिले जातील अशी गॅरेंटी दिली होती. गेल्या वर्षांत टायझरने 5 लाखांहून अधिक तयार कपड्यांची विक्री केली त्यापैकी केवळ 0.5% इतकेच कपडे या अंतर्गत बदलून द्यावे लागले.
यापुढेही अशा प्रकारची एक वर्षाची गॅरेंटी टायझरच्या प्रत्येक उत्पादनावर असेल. याबरोबरच टायझरच्या कोणत्याही दालनामधून खरेदी केलेले उत्पादन त्यात काही त्रुटी आढळल्यास ग्राहकाला टायझरच्याच इतर कोणत्याही दालनामधून बदलून घेता येणार आहे.
प्रामुख्याने शर्ट, टी-शर्ट, जीन्स आणि ट्राऊझरचे अनेकविध प्रकार उपलब्ध करून देणारे टायझर लवकरच सण समारंभ आणि विशेष कार्यक्रमांसाठीचे कपडे देखील सादर करणार आहे. टायझर कपड्यांच्या उत्पादनासाठी बारामती येथे खास उत्पादन प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्याची सध्याची उत्पादन क्षमता ही महिन्याला 35 हजार शर्ट आणि 8 हजार ट्राऊझर इतकी आहे. नजीकच्या भविष्यातील विस्तार योजना बघता उत्पादन क्षमता वाढवण्यात येईल त्यासाठी कंपनी 7-8 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)