टायगर श्रॉफ आणि दिशा पटणीमध्ये विसंवाद

टायगर श्रॉफच्या आगामी “बागी 2’ची खूप चर्चा होते आहे. त्याची ऍक्‍शन आणि स्टंटबाजी बघायला त्याचे फॅन्स अगदी आतूर झाले आहेत. “बागी 2’मध्ये टायगरची गर्लफ्रेंड दिशा पटणीलाही महत्वाचा रोल आहे. म्हणूनच दोघेही मिळून “बागी 2′ प्रमोशन करत आहेत. टायगरबरोबर काम करत असल्यामुळे दिशाचे फॅन फॉलोवरही खूप वाढले आहेत. पण त्यामध्ये तिची स्वतःची प्रसिद्धी मात्र मर्यादितच आहे. हे दोघे जिथे जिथे एकत्र जातात, तिथे सगळी गर्दी टायगर श्रॉफच्या भोवतीच गोळा होते.

चर्चाही होते ती केवळ टायगर श्रॉफचीच. हे टायगरचे वाढते कौतुक दिशाला आवडेनासे झाले आहे. टायगरला आपल्यापेक्षा जास्त लाईमलाईट मिळणे दिशाला खटकायला लागले आहे. यामुळे या दोघांच्या नात्यातही एकप्रकारचा कडवटपणा यायला लागला आहे. काही दिवसांपूर्वी ही जोडी एका डान्स कॉम्पिटिशनच्या अंतिम फेरीपर्यंत गेली होती. आपण एक डान्सर असूनही “बागी 2’मध्ये आपला एकही सोलो डान्स परफॉर्मन्स नाही, ही बाब देखील दिशाला खटकते आहे. नुकतेच “बागी 2’च्या प्रमोशनवेळी एकत्र असताना त्यांच्यातल्या वादाची ठिणगी पडलीच. त्यांच्यातला विसंवाद आता काही लपून राहू शकत नाही. साजिद नाडियादवालाच्या “बागी 2’च्या रिलीजपर्यंत कदाचित त्या विसंवादात आणखीन भर पडली असेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)