टायगर श्रॉफच्या फॅनमुळे दिशा पटणी हैराण

बॉलिवूड स्टारसाठी त्यांचे फॅन किती येडे असतात, याचे अनेक किस्से आहेत. असाच एक किस्सा टायगर श्रॉफच्या बाबतीत घडला आहे. टायगरला भेटण्यासाठी त्याच्या फिमेल फॅन्सनी अशी गर्दी केली की टायगरची गर्लफ्रेंड दिशा पटणीदेखील थक्क झाली. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. या घटनेचा एक व्हिडीओही सध्या व्हायरल झाला आहे.

मुंबईमध्ये एका ठिकाणी टायगर आणि दिशा एका ठिकाणी एकत्र गेले होते. पण कारमधून बाहेर पडल्यावर टायगरच्या फिमेल फॅन्सनी त्यांना गराडा घातला. टायगरने कशीबशी आपली सुटका करून घेतली आणि तो कारमध्ये जाऊन बसला. पण दिशाला कारमध्ये घुसण्याची संधीही मिळाली नाही. टायगरला भेटण्यासाठी फॅन्सपैकी एका मुलीने आपला हात दरवाज्यामध्ये घुसवला. त्यामुळे कारचा दरवाजाच लावता येईना.

टायगरच्या बॉडीगार्डनी या मुलीला हटवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने ऐकले नाही. टायगरची भेट झाल्यावरच तिने दरवाज्यातून हात बाहेर काढला. या गडबडीमुळे दिशा मागच्या सीटवर बसण्याऐवजी पुढच्या सीटवर जाऊन स्थिरावली. सलमान खानच्या “भारत’च्या शुटिंगसाठी ती माल्टाला गेली होती. तेथून परतल्यावर टायगरला भेटण्यासाठी ती आली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)