टायगर श्रॉफचा डान्सचा व्हिडीओ व्हायरल 

बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम डान्सर आहे. अभिनयासोबत आपल्या डान्सच्या कौशल्याने टायगर श्रॉफ प्रेक्षकांना आश्‍चर्यचकित करून सोडतो. टायगर नेहमीच सोशल मीडियावर त्याच्या डान्सचे व्हिडीओ अपलोड करत असतो. ते व्हायरल होण्यास जरा सुध्दा वेळ लागत नाही. शुक्रवारी टायगर श्रॉफने हॉलीवूड गायक जस्टिन बीबर याच्या गाण्यावर असा डान्स केला की, तो डान्स पाहिल्यानंतर तुम्ही बेभान होताल.
टायगर याने अलिकडेच गायक जस्टिन बीबर याच्या Where r u now या गाण्यावर डान्स केला आहे आणि तो व्हिडीओ इस्टाग्रामवर टाकला आहे. यामध्ये टायगर पहिल्यांदा शर्टलेसमध्ये दिसत असून आपली बॉडी दाखवत आहे. त्याच्या पुढच्या सीनमध्ये तो पुन्हा शर्ट घातलेला दिसत आहे. व्हिडीओमध्ये टायगरने बरेच आउटफिट बदलले आहेत. तरीदेखील त्याच्या डान्सवरून नजर हटणे शक्‍य नाही. हा व्हिडीओ टायगर श्रॉफने दोन दिवसांपूर्वी अपलोड केला होता. आतापर्यत इस्टाग्रामवर या व्हिडीओला 5 लाखाच्यावर लाईक मिळाले आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)