टायगर ग्रुपच्या खटाव तालुका अध्यक्षाला पिस्टलसह अटक

कोरेगाव पोलिसांची कामगिरी
वडूज , दि.2(प्रतिनिधी)
टायगर ग्रुप महाराष्ट्र याच्या खटाव तालुका अध्यक्षाला कोरेगाव पोलिसांनी अटक केली.यावेळी पोलिसांना त्याच्याकडे दोन पिस्तुले,जिवंत काडतुसे, तलवारी,सोन्याचे दागिने,चारचाकी असा 11 लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. शैलेश रमेश जाधव (रा. वडूज ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात वडूज पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक अविनाश राठोड यांनी तक्रार दिली आहे.

शैलेश जाधव हा टायगर ग्रुपचा खटाव तालुका अध्यक्ष असल्याने परिसरात दशहत करत होता. वडूज परिसरातील महिला त्याच्या त्रासाला वैतागल्या होत्या. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांच्याकडे त्याच्याविरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार त्यांनी शैलेश जाधव याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना कोरेगावच्या उपविभागीय पोलिस अधिकारी प्रेरणा कट्टे यांना दिल्या होत्या.

त्यानुसार कट्टे यांनी गुरूवारी रात्री वडूज परिसरात जाऊन ही कारवाई केली.कट्टे यांच्या पथकाने शैलेश जाधव याच्या घरी,कारमध्ये तसेच टायगर ग्रुप या नावाने असलेले त्याच्या कार्यालयात छापा टाकला. त्यावेळी पोलिसांना त्याच्या कमरेला एक तर कार्यालयात एक अशी दोन पिस्तुले सापडली. त्यानंतर त्याच्या कारची झडती घेतली. तेव्हा सुरा,गुप्ती,चॉपर,सत्तुर,कुऱ्हाडी,तलवारी मिळुन आल्या.

त्यावेळी शैलेश जाधव याने पोलिसांनी धक्काबुक्की करून पळुन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतला.

त्यानंतर त्याच्या विरोधात कोरतेगावच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयातील पोलिस उपनिरीक्षक अविनाश राठोड यांनी शासकीय कामात अडथळा आणला, अवैध शस्त्रे बाळगणल्याप्रकरणी तक्रार दिली. या कारवाईत पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी प्रेरणा कट्टे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक अविनाश राठोड,पो.हवा. राजेंद्र जाधव, सतिश कर्पे,पोपट बिचुकले,गणेश कापरे,किशोर भोसले,सागर भुजबळ या कोरेगावच्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह वडूज पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
442 :thumbsup: Thumbs up
61 :heart: Love
81 :joy: Joy
50 :heart_eyes: Awesome
16 :blush: Great
506 :cry: Sad
154 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)