टायगर्स, आर्यन स्कायलार्कस, आर स्टॅलियन्स, जीएससी पॅंथर्स संघांचे विजय 

इंडोशॉटले पीवायसी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा

पुणे: टायगर्स, आर्यन स्कायलार्कस, आर स्टॅलियन्स व जीएससी पॅंथर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना येथे सुरू असलेल्या पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित इंडोशॉटले पीवायसी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत आगेकुच नोंदवली आहे.

-Ads-

पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात अभिषेक ताम्हाणेच्या जलद नाबाद 47 धावांच्या बळावर टायगर्स संघाने ट्रूस्पेस जॅगवॉर्स संघाचा 9 गडी राखून एकतर्फी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना ट्रूस्पेस जॅगवॉर्स संघाने 6 षटकांत बिनबाद 68 धावा केल्या यात रवी कासटने नाबाद 38 तर राजेश कासटने नाबाद 22 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. 68 धावांचे लक्ष टायगर्स संघाने अभिषेक ताम्हाणेच्या 19 चेंडूत नाबाद 47 धावांच्या जोरावर 5.4 षटकांत 1 गडी गमावून 70 धावाकरत पुर्ण करून विजय मिळवला. अभिषेक ताम्हाणे सामनावीर ठरला.

तर, दुसऱ्या सामन्यात जयदीप गोडबोलेच्या 31 धावांसह आर्यन स्कायलार्कस संघाने सुपर लायन्स संघाचा 13 धावांनी पराभव केला. अन्य लढतीत आशिष देसाईच्या नाबाद 22 आर स्टॅलियन्स संघाने गोखले सिनर्जी कोब्राज संघाचा 9 गडी राखून पराभव केला. तर नंदन डोंगरेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर रेड बुल्स संघाने गोल्डफिल्ड डॉल्फिन्स संघाचा 7 धावांनी पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. हर्ष जैन नाबाद 17धावांच्या जोरावर जीएससी पॅंथर्स संघाने रेड बुल्स संघावर 5 गडी राखून विजय मिळवला.

सविस्तर निकाल: साखळी फेरी: 
रेड बुल्सल 6 षटकांत 3 बाद 65 (अमित परांजपे नाबाद 35, तन्मय चोभे 10, राहुल गांगल 2-12) पराभूत वि. जीएससी पॅंथर्स: 4.4 षटकांत 3 बाद 67 (कर्ना मेहता 18, हर्ष जैन नाबाद 17, सिद्धार्थ बदामीकर 13).
ट्रूस्पेस जॅगवॉर्स: 6 षटकांत बिनबाद 68 (रवी कासट नाबाद 38), राजेश कासट नाबाद 22) पराभूत वि.टायगर्स: 5.4 षटकांत 1 बाद 70 (अभिषेक ताम्हाणे नाबाद 47, मधुर इंगळहालीकर 12, राजेश कासट 1-8).
आर्यन स्कायलार्कस: 6 षटकांत 6 बाद 66 (जयदीप गोडबोले 31, अंकुश जाधव 8, आशिष राठी 1-8, श्री शिरोडकर 1-10) वि.वि. सुपर लायन्स: 6 षटकांत 3 बाद 53 (श्री शिरोडकर 23, रिषभ गडीया 12, सोहन आंगळे 1-6).
गोखले सिनर्जी कोब्राज : 6 षटकांत 3 बाद 56 (योगेश भोनले 36, विक्रांत पाटील नाबाद 9, रोहित बर्वे 1-5) पराभूत वि. आर स्टॅलियन्स: 5.3 षटकांत 1बाद 57 (आशिष देसाई नाबाद 22, हर्षद बर्वे 21).
रेड बुल्स: 6 षटकांत 4 बाद 55 (अमित परांजपे 16, तन्मय चोभे 14, रोहन छाजेड 1-2, अनिल छाजेड 1-10) वि.वि. गोल्डफिल्ड डॉल्फिन्स: 6 षटकांत 7 बाद 48 (अश्विन शहा 23, नंदन डोंगरे 2-2, समीर जोशी 1-7).

—————————–

हरमन


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)