टापयिंग फॉर इन्स्ट्रक्‍टरचा निकाल जाहीर

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत स्पेशल स्किल इन कॉम्प्यूटर टायपिंग फॉर इन्स्ट्रक्‍टर अॅण्ड स्टुडंटस परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेचा निकाल 32 टक्‍के इतका लागला असून, त्याचा निकाल राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

संगणक टायपिंग विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्यांना स्पेशल स्किल इन कॉम्प्यूटर टायपिंग फॉर इन्स्ट्रक्‍चर अॅण्ड स्टुडंटस परीक्षा महत्त्वाची आहे. या परीक्षेसाठी 507 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 395 उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यापैकी 130 उत्तीर्ण झाले असून, 251 उमेदवार अणुत्तीर्ण ठरले आहेत. निकालाची टक्‍केवारी 32.91 इतकी आहे.

ही परीक्षा दि.25 जानेवारी रोजी राज्यातील 24 केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका परिषदेच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन प्रिंट घेता येईल. मूळ प्रमाणपत्र, गुणपत्रके संबंधीत जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयामार्फत संगणक टंकलेखन संस्थांना वितरित करण्यात येतील. निकाल जाहीर झालेल्या दिनांकापासून 10 दिवसांत परीक्षार्थीने गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतिसाठी संस्थेतून ऑनलाईन अर्ज करणे आवश्‍यक आहे, अशी माहिती परिषदेचे आयुक्‍त सुखदेव डेरे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)