टाटा स्टीलकडून भूषण स्टीलचे अधिग्रहण

कर्ज दिलेल्या अनेक बॅंकांना मिळणार दिलासा

नवी दिल्ली  -तब्बल 48,100 कोटी रुपयांच्या कर्जभार असलेल्या भूषण स्टीलवर अखेर टाटा स्टीलचे नियंत्रण येणार आहे. याबाबतच्या निविदा प्रक्रियेत टाटा स्टीलने निविदा मिळविली आहे. टाटा समूहातील पोलाद कंपनीने या व्यवहारासाठी 35,000 कोटी रुपये मोजले असल्याचे समजले जाते. रोखीने हा व्यवहार झाला असून याद्वारे टाटा समूह देशातील अव्वल पोलाद उत्पादक ठरला आहे. 56 लाख टन उत्पादन क्षमता असलेल्या भूषण स्टीलच्या अधिग्रहणामुळे टाटा स्टीलच्या 13 लाख टन उत्पादन क्षमतेत आता अधिक भर पडणार आहे.

भूषण स्टीलला कर्ज देणाऱ्या बॅंकांच्या समितीने टाटा स्टीलची खरेदीसाठीची निविदा मंजूर केल्याची माहिती जाहीर केली. यामुळे भुषण स्टीलला कर्ज दिलेल्या बॅंकाना दिलासा मिळाला आहे. याबाबतच्या व्यवहाराला आता राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद तसेच भारतीय स्पर्धा आयोगाची परवानगी लागेल. टाटा स्टीलला नादारी आणि दिवाळखोरी संहितेच्या कंपनी नादारी मुक्तता प्रक्रिया यंत्रणेची निविदा जिंकल्याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे.

भूषण स्टीलवर विविध बॅंकांचे 48,100 कोटी रुपयांचे कर्ज आहे. तिच्या लिलावाकरिता कंपनीतील कर्मचारी गटानेही याबाबतच्या खरेदी प्रक्रियेत भाग घेतला होता. राष्ट्रीय कंपनी कायदे लवादाच्या निर्देशानुसार रिझव्‌र्ह बॅंकेने निश्‍चित केलेल्या 12 थकीत कर्जदार कंपन्यांच्या यादीत भूषण स्टीलचेही नाव आहे. भूषण स्टील खरेदीकरिता पात्र ठरल्यानंतर टाटा स्टीलने येत्या पाच वर्षांत दुप्पट पोलाद निर्मितीचे लक्ष्य जाहीर केले आहे. या नव्या व्यवहारामुळे टाटा स्टीलने देशातील या क्षेत्रातील अग्रेसर जेएसडब्ल्यू स्टीलला मागे टाकले आहे. तर भूषण स्टीलती पोलाद निर्मितीत देशातील तिसरी मोठी कंपनी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)