टाटा समूहात सांघिक नेतृत्वासाठी प्रयत्न

मुंबई: टाटा समूहाकरिता एक शिखर समूह व्यवस्थापन टीम तयार करण्याच्या तयारीत समूहाचे अध्यक्ष नटराज चंद्रशेखरन आहेत. आपल्या ग्रुपसाठी व्यवस्थापनाची टीम तयार करून ठेवणार आहेत. यातून वेळप्रसंगी टाटा ग्रुपची संपूर्ण जबाबदारी ते सांभाळू शकतील अशी व्यवस्था तयार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. देशातंर्गत गुपमध्ये 695,000 इतके कर्मचारी कार्यरत आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून लीडरशिपचे कार्यक्रम राबवले जातात.

टाटा ऍडमिनिस्टेट्रीव्ह सर्व्हिस सारखा प्रतिष्ठित मानला जाणारा उपक्रमाचा समावेश आहे. कंपनी चांगल्या लोकाच्या शोधात असून यात 100 हून जादा कंपन्या चालवता याव्यात यासाठी कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांचा व्यवस्थापन करण्यासाठी उपयोग करता विचार केला जात आहे. टाटा ग्रुपचे एचआर आणि डिजिटल अधिकारी आरती सुब्रमण्यन, शासकीय समन्वयक तन्मय चक्रवर्ती आणि टाटा सन्स कंपनीचे सचिव सुप्रकाश आदी अधिकाऱ्यांनी टीसीएसमध्ये योगदान दिले आहे त्यामुळे कंपनीच्या वाटचालीत आणखीन विकास आणि वाढ होण्यासाठी कर्मचाऱ्याच्या हुशारीचा वापर कंपनीच्या विकासात करुन घेण्यासाठी करण्यात येणार असल्याचे मत नोंदवण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)