नवी दिल्ली – कारची क्रेज असणारी गाडी म्हणून इंडिका, इंडिकोची ओळख होती. या गाड्या आपल्याला आता इतिहासात जाणार आहेत, कारण टाटा मोटर्सकडून या गाड्यांचे उत्पादन बंद करण्यात आले आहे. बाजारातील स्पर्धा व कमी झालेली विक्री या कारणांमुळे हा निर्णय घेतला आहे. काही वर्षांची आकडेवारी पाहीली असता हा खप अत्यंत अल्प होत गेल्याचे दिसून येते.

त्यामुळे एप्रिलपासून या गाड्यांचे उत्पादन थांबवण्यात आले आहे. तरीही ग्राहकांना सेवा पूर्वीप्रमाणाचे देण्यात येणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. एसआयएएमच्या आकडेवारीनुसार मार्च 2018 पर्यत इंडिकांचे 2,583 तर इंडिगोचे 1,756 युनिट्‌स विकले गेले असल्याची आकडेवारी तून स्पष्ट होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)