टाटा मोटर्सने पटकाविले विजेतेपद

  • 54 वी औद्योगिक क्रीडा स्पर्धा

पिंपरी,  (प्रतिनिधी) – औद्योगिक क्रीडा परिषदेने आयोजित केलेल्या 54 व्या वार्षिक क्रीडा स्पर्धेवर वर्चस्व राखत 44 गुण मिळवले. या दिमाखदार कामगिरीसह टाटा मोटर्सने विजेतेपद पटकाविले आहे. त्या खालोखाल 14 गुण मिळवत बजाज ऑटो संगाने उपविजेतेपदाचा मान मिळविला.

थिसेनक्रुप इंडस्ट्रीज येथील प्रशिक्षण सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या औद्योगिक क्रीडा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत टाटा मोटर्स आणि बजाज ऑटोच्या क्रीडा प्रतिनिधींनी संघाचे पारितोषिक स्वीकारले. संघटनेचे अध्यक्ष राजेंद नागेशकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला माजी अध्यक्ष मिलिंद गुंजाळ, सचिव वसंत ठोंबरे, उपाध्यक्ष नरेंद्र कदम, खजिनदार सदाशिव गोडसे, रफिक नायकवडी, विलास रसाळ व विविध कंपनी संघांचे क्रीडा प्रतिनिधी उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
खेळ-विजेता-उपविजेता
1) पासिंग व्हॉलबॉल- ऍम्युनिशन फॅक्‍टरी- टाटा मोटर्स
2) कबड्डी- ऍम्युनिशन- फॅक्‍टरी- टाटा मोटर्स
3) क्रिकेट- टाटा मोटर्स- सॉफ्टहार्ड
4) सिंहगड चढणे- बजाज ऑटो- टाटा मोटर्स
5) शूटिंग बॉल- सी.ए.एफ.व्ही.डी- टाटा मोटर्स
6) फुटबॉल- टाटा मोटर्स- बजाज ऑटो
7) ऍथलेटिक्‍स- टाटा मोटर्स- बजाज ऑटो
8) कॅरम- टाटा मोटर्स- पी.एम.पी.एल.
9) वेटलिफ्टिंग- टाटा मोटर्स- महिंद्रा
10) बुद्धीबळ- इन्फोसिस- सॅण्डविक
11) बास्केटबॉल- टाटा मोटर्स- बजाज ऑटो
12) योगा- बजाज ऑटो- टाटा मोटर्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)