टाटा मोटर्सच्या विक्रीत वाढ 

मुंबई: टाटा मोटर्सने जुलै 2018 मध्ये गतवर्षी याच काळाच्या तुलनेत 21 टक्‍के वाढ दर्शविली असून 51,896 युनिटसची विक्री केली आहे. गेल्या वर्षी याच काळात 42,775 युनिटसची विक्री केली होती. टाटा मोटर्सच्या भारतीय बाजारपेठेतील कमर्शियल व्हेईकल्सच्या विक्रीमध्ये जुलै 2018 मध्ये गेल्या वर्षी याच काळाच्या तुलनेत 25 टक्‍के वाढ झाली असून 34,817 युनिटसपर्यंत पोहचली आहे.

पॅसेंजर व्हेईकल्समध्ये जुलै महिन्यात 14 टक्‍के वाढ झाली असून 17,079 युनिटसची विक्री केली आहे. कंपनीने कमर्शियल व्हेईकल्स व पॅसेंजर व्हेईकल्सच्या निर्यातीमध्ये जुलै महिन्यात गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत 44 टक्‍क्‍यांची वाढ दर्शविली आहे. जुलै 2018 मध्ये 4971 युनिटसची निर्यात केली असून गेल्या वर्षी याच महिन्यात 3441 युनिटसची निर्यात केली होती.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)