टाटा मोटर्सकडून दरवाढ

मुंबई -टाटा मोटर्सनेही दरवाढीची घोषणा केली आहे. कंपनीने सांगीतले की, विविध उत्पादनाचे दर 60 हजार रुपयापर्यंत वाढविण्यात येणार आहेत. कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे दर वाढ करावी लागत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या अगोदर ऑडी कंपनीने आपल्या उत्पादनाचे दर वाढविले आहेत. काही वाहन कंपन्याना काही भाग आयात करावे लागतात.

मात्र सरकारने तयार आयात मोटारीबरोबरच सुट्या भागावरील आयात शुल्क वाढविल्यामुळे काही कार कंपन्या आगामी काळात दरवाढ करण्याची शक्‍यता आहे. टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन विभागाचे अध्यक्ष मायंक पारेक यांनी सांगितले की, या दरवाढीनंतरही कंपनीच्या विक्रीवर परिणाम होण्याची शक्‍यता कमी आहे. ते म्हणाले की, कच्च्या मालाचे दर वाढले आहेतच त्याचबरोबर देशातील आणि परदेशातील व्यापाराच्या वातावरणावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे आम्हाला दर वाढ करावी लागत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)