टाटा कंपनीने सेनापती बापटांचा वारसा चालविला

टाटा कंपनीचे सीएसआर प्रमुख दिलीप कवडे

पौड- टाटा कंपनीने सीएसआरच्या माध्यमातून मुळशी धरण परिसराच्या माले पंचक्रोशीतील मुलांसाठी आयटीआय सुरू केला आहे. दुर्गम आणि डोंगरी भागात राहणाऱ्या मुलांना व्यवसायिक शिक्षणांची संधी देवून टाटा कंपनी सेनापती बापट यांचा विकासाचा वारसा पुढे चालवित आहे, असे प्रतिपादन टाटा कंपनीचे सीएसआर प्रमुख दिलीप कवडे यांनी केले.
माले (ता. मुळशी) येथे मुळशी सत्याग्रहाचे प्रणेते सेनापती बापट यांच्या 138 व्या जयंतीनिमित्त माले येथील ऐतिहासिक सेनापती बापट स्मारक स्तंभावर पुष्पचक्र अर्पण करताना कवडे बोलत होते. मुळशी धरण विभाग शिक्षण मंडळाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी माजी आमदार शरद ढमाले, संस्थेचे संस्थापक रामचंद्र दातीर, रमेश जोरी, सुनील पासलकर, दशरथ गोळे, मुख्याध्यापक हनुमंत भूमकर, अंकुश बोऱ्हाडे, सुरेश बामणे, आयटीआयचे विद्यार्थी उपस्थित होते.
कवडे म्हणाले की, आयटीआयमध्ये धरण भागातील मुलांना सवलतीचे शिक्षण मिळावे, यासाठी टाटा कंपनी दरवर्षी 30 लाख रूपयांची तरतूद करत आहे. त्याचा लाभ येथील भागातील विद्यार्थ्यांना होत आहे. त्यामुळेच आतापर्यंत 88 महिलांनी टेलरिंगचा कोर्स पूर्ण करून व्यवसाय सुरू केला आहे. 154 महिलांनी नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला. आयटीआय पूर्ण केलेल्या 430 पैकी 410 विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे.
माजी आमदार ढमाले म्हणाले की, टाटाच्या सहकार्याने भागातील कौशल्याधिष्ठीत शिक्षण मिळू लागले आहे. टाटाबरोबरच रोटरी क्‍लब ऑफ पुणे सेंट्रल व मधूसूदन राठी ट्रस्ट या संस्थांनी आयटीआयला 20 लाखांचे डिजीटल साहित्य दिले आहे. रामचंद्र दातीर म्हणाले की, सेनापती बापटांशी मुळशीकरांशी जुळलेली नाळ त्यांच्या चौथ्या पिढीने आजही कायम ठेवली आहे. मुख्याध्यापक भूमकर यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)