टाटा ओपन : सुमित नागलची मुख्य फेरीत धडक

 ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरासवर तीन सेटमध्ये मात


इल्या इव्हाश्‍का, रिकार्डो ओझेदा लारा, टी मॉंटेरिओ यांचीही आगेकूच


मुख्य फेरीला आजपासून सुरूवात

पुणे – टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात भारताच्या सुमित नागल, बेलारूसच्या इल्या इव्हाश्‍का, स्पेनच्या रिकार्डो ओझेदा लारा, ब्राझीलच्या टी मॉंटेरिओ या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात भारताच्या सुमित नागल याने स्पेनच्या ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास 6-2, 3-6,6-4 असा तीन सेटमध्ये संघषपूर्ण पराभव करून मुख्य फेरी गाठली.

सामन्यातील पहिला सेट जिंकत सुमित नागलने आक्रमक सुरूवात केली. दुसऱ्या सेटमध्ये मॅसिरासने पुन्हा मुसंडी मारली. हा सेट सुमितने 3-6 असा गमाविला. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना कडवी झुंज दिली. अखेर हा सेट 6-4 असा जिंकत सुमितने विजयावर शिक्कामोर्तब केला.या सामन्यात जागतिक क्रमवारीत 223व्या स्थानावर असलेल्या नागल याने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले.

या विजयामुळे 20 वर्षीय सुमित नागालला बेलारूसच्या इल्या इव्हाश्‍का याच्याशी टाटा पहिल्या फेरीत झुंज देण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेच्या मुख्य फेरीला उद्यापासून (दि. 1जानेवारी 2018 रोजी) सुरुवात होणार आहे. मुख्य फेरीत प्रवेश निश्‍चित केल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या सुमितने बेलारूसच्या इव्हाश्‍का विजय मिळविण्याचा विश्वास व्यक्त केला.

सुमित म्हणाला की, टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश मिळविल्याबद्दल मला अत्यंत आनंद होत असून इव्हाश्‍काविरुद्ध पहिल्या फेरीच्या लढतीसाठी मी अतिशय उत्सुक आहे. पहिल्या फेरीची हि लढत निश्‍चितच चुरशीची होईल. परंतु ती जिंकून स्पर्धेच्या उत्तरार्धापर्यंत टिकून राहण्याचा मला विश्वास वाटतो.
स्पेनच्या रिकार्डो ओझेदा लारा ब्राझीलच्या जे सुएजाने 6-3, 6-4 असा पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली. बेलारूसच्या इल्या इव्हाश्‍काने स्पेनच्या कार्लोस टेबर्नरचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. ब्राझीलच्या टी मॉंटेरिओ याने भारताच्या प्रजनेश गुणनेश्वरणचे आव्हान 7-5 7-5 असे मोडीत काढले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम पात्रता फेरी:
टी मॉंटेरिओ(ब्राझील) वि. वि. प्रजनेश गुणनेश्वरण(भारत) 7-5, 7-5.
सुमित नागल (भारत) वि.वि. ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास(स्पेन) 6-2, 3-6, 6-4.
इल्या इव्हाश्‍का(बेलारूस)वि.वि.कार्लोस टेबर्नर(स्पेन) 6-3, 6-2.
रिकार्डो ओझेदा लारा(स्पेन)वि.वि.जे सुएजा(ब्राझील) 6-3, 6-4.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)