टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धा: भारताच्या साकेत मायनेनीची विजयी सलामी

पुणे: टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत भारताच्या वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या साकेत मायनेनी याने तैपेईच्या जेसन जूंगचा 6-1, 5-7, 6-2 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजयी सलामी दिली.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या साकेत मायनेनी याने तैपेईच्या जेसन जूंगचा 6-1, 5-7, 6-2 असा संघर्षपूर्ण पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला. ऑस्ट्रियाच्या सेबस्तियन ऑफनर याने दुसऱ्या मानांकित बेल्जीयमच्या रूबेन बेमेलमन्सचा 5-7, 6-3, 6-1असा तीन सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. इटलीच्या सातव्या मानांकित जियालूइजी क्वेनजी याने वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या शशी कुमार मुकुंदचा 6-1, 6-1असा एकतर्फी पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला. ब्राझीलच्या तिसऱ्या मानांकित थायगो मॉंटेरोने जर्मनीच्या डॅनियल ब्रॅंड्‌सचा टायब्रेकमध्ये 7-6(5), 7-5असा पराभव करून आगेकूच केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सविस्तर निकाल: पहिली पात्रता फेरी:
साकेत मायनेनी(भारत)वि.वि.जेसन जूंग(तैपेई) 6-1, 5-7, 6-2;
सेबस्तियन ऑफनर(ऑस्ट्रिया)वि.वि.रूबेन बेमेलमन्स(बेल्जीयम)(2)5-7, 6-3, 6-1;
जियालूइजी क्वेनजी(इटली)(7)वि.वि.शशी कुमार मुकुंद(भारत)6-1, 6-1;
थायगो मॉंटेरो(ब्राझील)(3)वि.वि.डॅनियल ब्रॅंड्‌स(जर्मनी) 7-6(5), 7-5;
सिमॉन बोलेली(इटली)(5)वि.वि. ब्रेडन चेन्यूर(कॅनडा)6-3, 7-6(5);
अँटोनी हॉंग(फ्रांस)(6)वि.वि.आंद्रेज मार्टिन(स्लोव्हाकिया) 6-1, 6-2;

पहिल्या फेरीत प्रजनेश समोर मायकेलचे आव्हान

एटीपी 250 वर्ल्ड टूर टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेचा मुख्य फेरीचा ड्रॉ समारंभ थाटात पार पडला. मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत भारताचा अव्वल मानांकित खेळाडू प्रजनेश गुन्नेश्वरणचा सामना अमेरिकेच्या मायकेल मोह याच्याशी होणार आहे.
टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेचा मुख्य फेरीचा ड्रॉ पीएमसीचे आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते काढण्यात आला. यावेळी स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे मानद सचिव सुंदर अय्यर, एटीपी सुपरवायझर मिरो ब्रातोव, एटीपी टूरचे व्यवस्थापक अर्नाउ बृजेस, भारताचा प्रजनेश गुन्नेश्वरन, गतविजेता सिमॉन जाईल्स आदी मान्यवर उपस्थित होते.

जागतिक क्र.103असलेल्या प्रजनेश गुन्नेश्वरण आणि मायकेल मोह हे दोघेही (अलेक्‍झांडर वास्के टेनिस युनिव्हर्सिटी) या एकाच अकादमीत सराव करत आहेत. यावेळी प्रजनेश म्हणाला कि, मायकेल मोह आणि मी एकाच अकादमीत सराव करत असून आम्ही दोघांनी याआधीचा मौसम देखील एकत्र खेळला आहे. पण त्याच्याविरुद्ध मी उत्तम खेळ करेन आणि पहिल्या फेरीत त्याचे आव्हान संपुष्टात आणेन. गतवर्षीच्या स्पर्धेत मला चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यावेळी भारतात मी पहिल्यांदाच खेळत असल्यामुळे माझ्यासाठी तो अनुभव अविस्मरणीय होता, असे गतविजेता सिमॉन जाईल्स याने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)