टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धा: भारताच्या साकेत मायनेनीचा मुख्य फेरीत प्रवेश

पुणे: टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत भारताच्या वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या 31 वर्षीय साकेत मायनेनी याने बेलारूसच्या 26 वर्षीय इगोर गेरासिमोव्हचा 6-4, 6-7(4), 7-6(4) असा संघर्षपूर्ण पराभव करून स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या साकेत मायनेनी याने बेलारूसच्या इगोर गेरासिमोव्हचे आव्हान 2तास 10मिनिटांत मोडीत काढले. चुरशीच्या झालेल्या सामन्यात पहिल्या सेटमध्ये साकेतने आक्रमक खेळ करत इगोरची चौथ्या व सहाव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 6-4 असा जिंकून आघाडी घेतली. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये इगोरने वरचढ खेळाचे प्रदर्शन करत साकेतविरुद्ध हा सेट 7-6(4)असा जिंकून सामन्यात बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये साकेतने इगोरची दुसऱ्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात 4-1 अशी आघाडी घेतली. पण इगोरने जोरदार खेळ करत सलग चार गेम जिंकून 5-4 अशी आघाडी घेत आपले आव्हान कायम राखले. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये साकेतने चपळाईने खेळ करत इगोरविरुद्ध हा सेट 7-6(4) असा जिंकून विजय मिळवला. मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत साकेत पुढे फ्रान्सच्या बेनॉय पेरेचे आव्हान असणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इटलीच्या पाचव्या मानांकित सिमॉन बोलेली याने ऑस्ट्रियाच्या सेबस्तियन ऑफनरचा टायब्रेकमध्ये 7-6(4), 7-5असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. सहाव्या मानांकित फ्रांसच्या अँटोनी हॉंगने ब्राझीलच्या तिसऱ्या मानांकित थायगो मॉंटेरोचा 4-6, 6-3, 6-2असा तीन सेटमध्ये पराभव केला. कॅनडाच्या फेलिक्‍स ओगर इलियसमी याने इटलीच्या सातव्या मानांकित जियालूइजी क्वेनजी याचा 7-5, 6-3 असा पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली.

सविस्तर निकाल: अंतिम पात्रता फेरी:
साकेत मायनेनी (भारत) वि.वि. इगोर गेरासिमोव्ह (बेलारूस) 6-4, 6-7(4), 7-6(4), सिमॉन बोलेली (इटली) (5) वि.वि. सेबस्तियन ऑफनर (ऑस्ट्रिया) 7-6(4), 7-5, अँटोनी हॉंग (फ्रांस) (6) वि.वि.थायगो मॉंटेरा े(ब्राझील) (3) 4-6, 6-3, 6-2, फेलिक्‍स ओगर इलियसमी (कॅनडा) वि.वि. जियालूइजी क्वेनजी (इटली) (7) 7-5, 6-3.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)