टाटा ओपन टेनिस स्पर्धा: पुण्याच्या अर्जुन कढे याला वाईल्डकार्ड

पुणे: पुण्याचा अर्जुन कढे याला एकेरीत वाईल्ड कार्डद्वारे विशेष प्रवेश देण्यात आला असल्याचे टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेच्या संयोजकांनी जाहीर केले आहे. वाईल्ड कार्डद्वारे स्पर्धेत विशेष प्रवेश देण्यात आलेला 24 वर्षीय अर्जुन कढे हा तिसरा खेळाडू असून याआधी प्रजनेश गुन्नेश्वरण, रामकुमार रामनाथन यांना टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेच्या या मौसमासाठी वाईल्ड कार्ड प्रदान करण्यात आले आहे.

एक महिन्यापूर्वी झालेल्या केपीआयटी एमएसएलटीए चॅलेंजर स्पर्धेच्या पहिल्या फेरीत अर्जुन कढेचा सामना रामकुमार रामनाथन झाला होता. या सामन्यात अर्जुनने मानांकित खेळाडू रामकुमारवर सनसनाटी विजय मिळवला होता. टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार म्हणाले की, अर्जुनने अनेक आव्हाने धैर्याने पूर्ण केली आहेत. तसेच, पुण्यात घरच्या मैदानावर स्पर्धा होत असल्यामुळे त्याच्यासाठी हि एक जमेची बाजू ठरणार आहे. वाईल्ड कार्ड प्रवेश करणाऱ्या सर्व आमच्या खेळाडूंना आम्ही शुभेच्छा देतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धा पुण्यात म्हाळुंगे बालेवाडी येथे 31 डिसेंबर 2018 ते 5 जानेवारी 2019 या कालावधीत होणार आहे. स्पर्धेत गतविजेता व विश्व क्रमवारीत 30व्या क्रमांकाचा फ्रेंच खेळाडू सिमॉन जाईल्स तसेच, जागतिक क्र.6 खेळाडू केविन अँडरसन (दक्षिण अफ्रिका), जागतिक क्र.25 खेळाडू हुयोन चूँग आणि जागतिक क्र. 45 खेळाडू मालेक झाजेरी (ट्युनेशिया) हे दिग्गज खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)