टाकेवाडीने जिंकला वॉटर कप

????????????????????????????????????

भांडवलीला दुसरे बक्षिस:माण तालुक्‍यात जल्लोष
बिजवडी:प्रतिनिधी
पाणी फौंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत टाकेवाडी ता.माण जि.सातारा या गावाने विजेतपद पटकावून 75 लाखाचे बक्षीस मिळवले.या राज्यस्तरीय स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे संयुक्त बक्षीस प्रत्येकी 25 लाख रूपये भांडवली ता.माण जि.सातारा व सिंदखेड ता.मोताळा जि.बुलढाणा या गावांना देण्यात आला.तर तृतीय क्रमांकाचे संयुक्त प्रत्येकी 20 लाख रूपये बक्षीस आनंदवाडी ता.आष्टी जि.बीड व उमठा ता.नरखेड जि.नागपूर या गावांना मिळाला आहे.
पाणी फौंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप पर्व तिसरे या स्पर्धेत माण तालुक्‍यातील टाकेवाडी व भांडवली ही दोन गावे राज्यस्तरीय स्पर्धेत विजेती ठरल्याने बनगरवाडी ता.माण गावाला तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळाले.खटाव तालुक्‍यातील गोपूज व कोरेगाव तालुक्‍यातील रूई गावाला तालुकास्तरीय क्रमांक मिळाला आहे.
पुणे येथील बालेवाडीत पार पडलेल्या वॉटर कप पुरस्कार सोहळ्यात जलसंधारणात भरीव काम करणाऱ्या गावांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ,राज ठाकरे ,अमीर खान ,किरण राव , ना.राम शिंदे ,ना.विजय शिवतारे , माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , राधाकृष्ण विखेपाटील , पोपटराव पवार , सिनेअभिनेते , उच्चपदस्थ अधिकारी ,पाणी फौंडशन ,बीजेएसचे शांतीलाल मुथा व कार्यकर्ते , शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेत राज्याला आदर्शवत असे बिदाल ता.माण येथील गावाने जलसंधारणाचे काम केले असताना बिदाल गावच वॉटर कप मिळवेल असा विश्वास राज्यभरातून व्यक्त केला जात होता.मात्र गेल्यावर्षी सर्वांच्या आशेवर पाणी फिरत या स्पर्धेत बिदाल गावाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.तरीही हताश न होता पुन्हा नव्या जोमाने पर्व च्या स्पर्धेत माणवासियांनी जलसंधारणाचे मोठे काम हाती घेतले.यात भांडवली , टाकेवाडी ,बनगरवाडी , वाघमोडेवाडी ,भाटकी ,दिवड ,नरवणे ,कुकुडवाड ,येळेवाडी आदी गावांनी वॉटर कप आपल्या गावात आणण्यासाठी अहोरात्र झटून श्रमदान केले होते.
राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यास प्रारंभ झाल्यानंतर द्वितीय क्रमांकाचे संयुक्त बक्षीस भांडवलीला जाहीर झाल्यानंतर माण तालुक्‍याने मोठा जल्लोष केला.त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर करताना सातारा जिल्ह्याचे नाव अगोदर सांगतानाच माण तालुक्‍यातील जनतेने मोठा जल्लोष करत टाकेवाडी गावाचा विजय असो असा जयघोष केला. टाकेवाडी वॉटर कपचा मानकरी झाल्याचे पुकारताच माणचे आमदार जयकुमार गोरे व टाकेवाडी ग्रामस्थ व्यासपीठावर वॉटर कप आणण्यासाठी उपस्थित होताच मोठा जल्लोष करण्यात आला
चौकट – माण तालुक्‍यातून आमदार जयकुमार गोरे व माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख सोहळ्याला आवर्जुन उपस्थित होते.टाकेवाडी व भांडवली गावाने स्पर्धेत यश मिळवल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांच्यासमवेत फोटोसेशन केले. टाकेवाडी ग्रामस्थांनी वाटर कप बरोबरच आमदार जयकुमार गोरे , पाणी फौंडेशनचे समन्वयक अजित पवार ,डॉ.प्रदीप पोळ यांना खांद्यावर घेत जल्लोष साजरा केला.

या स्पर्धेत बीजेएसच्या मशीनरीने राज्यात 8.5 लाख तास कामे करत मोठा हातभार लावला असून यात सातारा जिल्ह्यात सर्वात जास्त कामे झाली आहेत.पण ती फक्त शरद पवार साहेबांच्यामुळे झाली आहेत.त्यांनी विविध माध्यमातून सात कोटी रूपयांच्यावर निधी डिझेलसाठी उपलब्ध करून दिल्यामुळे मोठी कामे झाली आहेत असे बीजेएसचे शांतीलाल मुथा यांनी आपल्या मनोगतात सांगितल्यावर उपस्थितांकडून जल्लोष करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोगतात माजी कोकण आयुक्त व तत्कालिन जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख यांनी जलयुक्त शिवार व जलसंधारणाच्या कामात केलेल्या कार्याचा आवर्जुन उल्लेख करत त्यांनी यात महत्वाची भूमिका बजावल्याचेही सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)