टाकवे विविध कार्यकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

टाकवे बुद्रुक – टाकवे विविध कार्यकारी सोसायटीच्या 70 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा टाकवे ग्रामपंचायतीच्या सभागृहात नुकतीच झाली. या सभेला जिल्हा बॅंकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे व बॅंकेचे अधिकारी साबळे उपस्थित होते.
संस्थेच्या वतीने बाळासाहेब नेवाळे यांचा सन्मान विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. सभेच्या सुरुवातीला संस्थेचा अहवाल वाचन सचिव मदन आडिवळे यांनी केले.

या सभेत प्रामुख्याने संस्था नफ्यात आणण्यासाठी थकीत कर्जदारांवर वेळीच करावाई करणार असल्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या वेळी बाळासाहेब नेवाळे यांनी सभासदांना मोलाचे मार्गदर्शन केले. या वेळी उपस्थित माजी अध्यक्ष मारुती असवले, संभाजी टेमगिरे, विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत वाघमारे, उपाध्यक्ष गणेश मोरे, महादू गुणाट, दत्तात्रय घोजगे, अनंता असवले, दत्ता मालपोटे, विकास असवले, दिलीप आंबेकर, गुलाब परदेशी, अनुसया गायकवाड, रूपाली कडू, वसंत चोरघे, अनिल रामचंद्र मालपोटे तसेच आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभासद, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन मारुती असवले यांनी केले. प्रास्ताविक संभाजी टेमगिरे यांनी केले. चंद्रकांत वाघमारे यांनी आभार मानले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)