टाकवे येथे डोळे तपासणीत 450 चष्मे वाटप

टाकवे बुद्रुक – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंदर मावळ शिवसेना व सोमनाथभाऊ कोंडे मित्र परिवार आयोजित डोळे तपासणी व 20 रुपयांत चष्मे वाटप करण्यात आले. टाकवे येथील भैरवनाथ मंदिरात दोन दिवसीय शिबीर पार पडले. या शिबिरात शाळेतील लहान मुले, महिला ज्येष्ठ नागरिक अशा तब्बल 450 गरजुंनी सहभाग घेतला होता.

या वेळी तालुकाप्रमुख राजुभाऊ खांडभोर, उपजिल्हा प्रमुख भारत ठाकूर, उपसभापती शरद हुलावळे, तालुका संघटक सुरेश गायकवाड, सहसंघटक यशवंतराव तुर्डे, उपतालुकाप्रमुख चंद्रकांत भोते, उपतालुका प्रमुख मदन शेडगे, टाकवे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रिया मालपोटे, संचालक संत तुकाराम सहकारी साखर कारखाना अंकुश आंबेकर, नंदू असवले, संचालक खरेदी-विक्री संघ संभाजी टेमगिरे, युवक अध्यक्ष विलासराव मालपोटे, शिवसेना विद्यार्थी तालुका प्रमुख धनंजय नवघने, आंदर मावळ शिवसेना संघटक सोमनाथ कोंडे, टाकवे गावचे पोलीस पाटील अतुल असवले, विभाग प्रमुख जयदास ठाकर, योगेश काकरे, चेअरमन चंद्रकांत वाघमारे, आंदर मावळ युवा अध्यक्ष काळुराम घोजगे, शिक्षण समिती अध्यक्ष चंद्रकांत असवले, उपाध्यक्ष आनंता असवले, माजी अध्यक्ष महादु गुणाट, माजी सरपंच प्रल्हाद जांभुळकर, विलास आडिवळे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य राजु असवले, उपसरपंच गजानन खरमारे, विभाग संघटक उमेश गावडे, अंकुश सातकर, ह.भ.प. देवराम असवले, रोहिदास असवले, माऊली गायकवाड, संपत शिंदे, खंडू सोंडेकर, सलमान आत्तार, अक्षय मोरे, फिरोज खान, सिद्धेश लोंढे, दत्ता मोहळ आदी व ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी मदन शेडगे यांनी प्रास्ताविक केले. सोमनाथ कोंडे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)