टाकवे बुद्रुक-वडेश्‍वर गटातील 33 दलित वस्त्यांमध्ये समाजप्रबोधन साहित्य वाटप

टाकवे बुद्रुक – पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या शोभा सुदाम कदम यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद समाज कल्याण समितीच्या 20 टक्‍के निधीतून समाज प्रबोधन साहित्य आणि दरिपंजा (सतरंजी) टाकवे-वडेश्‍वर गटातील 33 दलित वस्त्यांमध्ये समाज प्रबोधन साहित्य आणि 32 वस्त्यांमध्ये दरिपंजा (सतरंजी) वाटप राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम व महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत यांचे हस्ते करण्यात आले.

मावळ पंचायत समितीच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमास टाकवे बुद्रुक-वडेश्‍वर गटातील भोयरे, कोंडीवडे नामा, निगडे, कल्हाट, आंबळे, शेटेवाडी, उकसान, माळेगाव बुद्रुक, सावळा, जांबवडे, इंगळुन, कोंडीवडे आं मा, कुसवली, खांड, कुसुर, कशाळ, आंबळे, शिरे, मंगरुळ, नाणे, उकसान पुर्नवसन, डाहुली, बोरवली, वहानगाव, डाहुली, कांब्रे आं मा, वडेश्‍वर, माऊ, टाकवे बुद्रुक, फळणे आदी मागासवर्गीय आणि आदिवासी वस्तीतील 33 लाभार्थ्यांना सामाजिक प्रबोधन साहित्याचे वाटप केले.

तसेच मागासवर्गीय आणि आदिवासी वस्तीमध्ये समाज मंदिरात बसण्यासाठी दोन 32 लाभार्थ्यांना सतरंजी वाटप पुढीलप्रमाणे : नवलाख उंब्रज, जाधववाडी, बधलवाडी, मिंडेवाडी, परिटेवाडी, जांबवडे, निगडे, कल्हाट, नाणे, खांडी, कुसूर, आंबळे, शेटेवाडी, भोयरे, टाकवे बुद्रुक, बेलज, फळणे, करंजगाव, पालेनामा, मोरमारवाडी, कांब्रे नामा, माळेगाव बुद्रुक, तळपेवाडी, पिंपरी, सुदुंबंरे आदींना वाटप केले.

या वेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, पुणे जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा सुवर्णा राऊत, आदिवासी संघटनेचे अध्यक्ष राघु तळपे, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक अंकुश आंबेकर, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष कैलास गायकवाड, संघटनमंत्री नारायण ठाकर, कैलास खांडभोर, माजी सरपंच नामदेव शेलार प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि मागासवर्गीय वस्तीमधील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी शोभा कदम म्हणाल्या की, सर्व घटकांना योग्य न्याय देऊन सर्व समावेशक काम केले जाईल. बबनराव भेगडे म्हणाले की, 80 टक्‍के समाजकारण व 20 टक्‍के राजकारण करत असताना सर्व स्तरातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन विकास काम करावे, असा सल्ला दिला. साठ गावांमध्ये साहित्य वाटप केल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)