टाकवे बुद्रुक येथे रोहिदास महाराज जयंती साजरी

टाकवे बुद्रुक, (वार्ताहर) – श्रीसंत रोहीदास महाराज यांची 641 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी मूर्तीचे पूजन, सत्यनारायण महापूजा झाली. जयंतीनिमित्त टाकवे येथील अंगणवाडीतील लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायतीचे माजी सदस्य नवनाथ आबेकर, गुणवंत कामगार नितीन कदम, मारुती आबेकर, मंडळाचे अध्यक्ष संकेत जगताप, उपाध्यक्ष अमोल आबेकर, खजिनदार कैलास जगताप, सचिव अनिकेत आबेकर, राजू जगताप, सोमनाथ जगताप, अक्षय जवळकर, विशाल जगताप आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)