टाकवे बुद्रुक येथे चिकन विक्रेत्याकडे मागितली 10 लाखांचीा खंडणी

वडगाव मावळ – टाकवे बुद्रुक (ता. मावळ) येथील एका चिकन विक्रेत्याकडे संरक्षणासाठी 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार घडला.

बाजीराव सुदाम खुरसुले (रा. खुरसुलेवाडी, निगडे, ता. मावळ) असे आरोपीचे नावे आहे. या प्रकरणी उमर उस्मान मकबूल शेख (वय 38, रा. टाकवे बुद्रुक, ता. मावळ) यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे टाकवे बुद्रुक येथे चिकन विक्रीचे दुकान आहे. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास बाजीराव याने शेख यांना फोन केला. फोनवर बाजीराव याने शेख यांच्याकडे त्यांच्या संरक्षणासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली. तसेच याबाबत पोलिसांना सांगितल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)