टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण

वडगाव मावळ, (वार्ताहर) – टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने “एकच लक्ष 4 कोटी वृक्ष’ योजनेंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

सरपंच सुप्रिया मालपोटे यांनी “झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याचा’ संदेश दिला. या वेळी उपसरपंच स्वामी जगताप, माजी उपसरपंच अविनाश असवले, रोहिदास असवले, गोरख मालपोटे, मुख्याध्यापक शिवाजी जरग, शिक्षण समिती अध्यक्ष ऋषीनाथ शिंदे, अनिल मालपोटे, गुलाब जांभूळकर, भिमराव साबळे, अश्‍विनी असवले, मिना असवले, सुशिला मालपोटे, सहिंद्रा लोंढे, उमाकांत मदगे, ग्रामविकास अधिकारी एस. बी. बांगर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)