टाकवे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्रीमती मीनाताई असवले

टाकवे- टाकवे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसंरपंचपदी बिनविरोध निवड झालेल्या मीनाताई असवले यांची निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करताना इतर ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवर.

टाकवे बुद्रुक – टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मीनाताई सुरेश असवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच सुप्रिया मालपोटे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अश्‍विनी असवले यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली. उपसरपंच पदासाठी मीना असवले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. मारुती असवले, शिवाजी असवले, अनिल असवले, नंदशेठ असवले, अनिल मालपोटे, राजु असवले यांनी मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य रोहिदास असवले,अविनाश असवले, स्वामी जगताप, गोरख मालपोटे, अश्‍विनी असवले, साधना असवले, सहिद्रा लोंढे, भिमराव साबळे, सारीका कोकाटे, उमाकांत मदगे, मधुकर कोकाटे, सचिन असवले, विकास असवले, अमित असवले, नवनाथ आबेकर, सनी असवले, समीर असवले तसेच ग्रामस्थ उपस्थितीत होते. ग्रामविकास अधिकारी एस.बी.बांगर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)