टाकवे खुर्द येथे बिबट्याचा वावर

  • नागरिकांमध्ये घबराट : बिबट्याचे पिल्लू असल्याचा अंदाज

कार्ला – मावळ तालुक्‍यातील कार्ला गावाजवळील टाकवे खुर्द गावाजवळ गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून, ग्रामस्थांमध्ये एकच घबराट उडाली आहे. रानोमाळ फिरणारा बिबट्या हा मादी जातीचा पिल्लू असल्याचे नागरिकांनी वनविभागाला सांगितले आहे.

मावळ तालुक्‍यातील टाकवे खुर्द या गावाजवळ स्मशानभूमी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून एक बिबट्या काही लोकांना दिसला आहे; मात्र त्याने अजूनपर्यंत तरी कोणावर हल्ला केल्याचे आढळून आलेले नाही. ग्रामस्थांनी याची माहिती तातडीने वन विभागाला दिली.

वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी संजय मारणे व वन्यजीव रक्षक संस्था मावळचे अध्यक्ष निलेश गराडे, निलम दीदी, हार्दिक मालवाडीया, मॉन्टी देशमुख, रोहित गायकवाड, अनिल आंद्रे व गोरक्ष ह. गरुड त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन परिसरात शोध घेतला.

लोणावळा कार्ल्याजवळ टाकवे खुर्द गाव आहे. जुना पुणे-मुंबई रोड या दरम्यान जंगल आहे. गावातील लोक कामाधंद्यासाठी या मार्गाचा वापर करतात. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना बिबट्याची चाहूल लागत होती. मंगळवारी सायंकाळी या रस्त्यावर काही जणांना तो दिसला. त्यांनी तातडीने इतरांना याची माहिती दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाकवे गावात जाऊन लोकांना बिबट्यापासून काय काळजी घ्यायची याची माहिती दिली. त्यांना बिबट्या दिसला, तर त्यांनी फटाके वाजवावेत. रात्री उशिरा एकट्याने बाहेर पडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

बिबट्या हा त्याच्या जंगलाच्या हद्दीतच आहे. त्याने गावात प्रवेश केला नाही. अजूनपर्यंत त्याने कोणावर हल्ला केलेला नाही. हे पिल्लू असल्याने त्याची मादीही जवळपास असण्याची शक्‍यता आहे. जर पिल्लाला पकडले तर मादी हिंसक होऊ शकते. त्यामुळे अजून तरी पिंजरा लावण्याचा विचार वन विभागाने केलेला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)