टाकळी हाजी शाळेत विद्यार्थ्यांनी बनवल्या गणेश मूर्ती

टाकळी हाजी- जिल्हा परिषद शाळा, टाकळी हाजी येथे विद्यार्थ्यांनी शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार करून एक आदर्श निर्माण करण्याचे काम केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कार्यानुभव या तासिकेच्या माध्यमातून अतिशय सुरेख गणेश मूर्ती तयार केल्या आहेत. या मूर्ती करताना स्वनिर्मितीचा आनंद आणि विद्यार्थ्यांचा पर्यावरण विषयी असलेली जाणीव विद्यार्थ्यांमध्ये जागृत होते. तसेच काही विद्यार्थ्यांनी मूर्तीला विविध रंग भरले. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक आशा खोमणे, मंगल गावडे, मच्छिंद्र देवकर, प्राजक्ता देशमुख या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी सर्वांचे कौतुक केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)