टाकळी हाजी -तामखरवाडी येथे आढळले बिबट्याचे बछडे

टाकळी हाजी-टाकळी हाजी -तामखरवाडी (ता. शिरूर)) येथे चांडोहचे आदर्श शिक्षक सुनील करू खोमणे यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना बिबट्याच्या मादीचे चार बछडे आढळून आले. त्यावेळी बिबट्याची मादी ऊस कामगारांवर धावली असता लोकांनी हुसकावल्याने जवळच असलेल्या ऊसाच्या शेतात धूम ठोकली. यावेळी सुनील खोमणे यांनी तत्काळ वनविभागाला संपर्क केला असता वनविभागाचे अधिकारी विठ्ठल भुजबळ, प्रवीण क्षीरसागर, एस. एस. तांदळे, वनपाल दहातोंडे हे तत्काळ हजर झाले. त्यावेळी चार बछडे एका कॅरेटमध्ये ठेऊन ऊसात ठेवण्यात आले. यावेळी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली. यावेळी भुजबळ म्हणाले, पिंजरा लावला तर बिबट्या जेरबंद होईल. परंतु बछडे वाचवण्यासाठी मादीला जेरबंद करता येणार नाही. मागील आठडवड्यात खोमणे यांच्या मालकीच्या दोन करडांना बिबट्याने फस्त केले होते. परंतु बिबट्याची पिल्ले सापडल्यानंतर देखील खोमणे यांनी वनखात्याच्या ताब्यात देऊन त्यांचा वन्यप्राण्यांप्रती असलेला जिव्हाळा दिसून आला. वनखात्याचे अधिकारी यांनी दिवसभर पिलांवर संरक्षण म्हणून लक्ष ठेऊन होते. रात्री मादी येऊन पिलांना घेऊन जाईल, असे भुजबळ यांनी सांगितले. वनखात्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक टाकळी हाजीचे सरपंच दामू घोडे यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)