टाकळी हाजीत नवरात्रोत्सवनिमित्त हरिनाम सप्ताह

टाकळी हाजी- नवरात्रोत्सवानिमित्त येथील मळगंगा देवीजवळ अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले असून येथे घटस्थापना करण्यात आली आहे.
यावेळी सप्ताहाचे अकरावे वर्ष असून, विणा पूजन युवानेते अजित गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चेअरमन बन्सी घोडे, सुभाषमहाराज गावडे, भाऊसाहेब महाराज चोरे, शिवाजीमहाराज कांदळकर, रोहीदास घोडे, पोपटमहाराज उचाळे, अंकुश उचाळे, अशोक गावडे, गंगाराम पवळे, संतोष चासकर, भाऊ गुंडा घोडे, सुभाष घोडे, तुकानाना घोडे, लक्ष्मण भाईक, गणेश घोडे, देवराम घोडे, देवीदास पवार, शरद घोडे, सोमनाथ घोडे, दशरथ थोरात, शंकर होने, सोना घोडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. बुधवारी रात्री किसनमहाराज रिठे यांचे किर्तन झाले. श्रीमती कमलाबाई भवरीलाल फुलफगर यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप केले. दररोज रात्री 7 ते 9 या वेळेत कीर्तन, त्यानंतर महाप्रसाद, रात्री भजनांचा कार्यक्रम होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)