टाकळी भीमातील रांजण खळगे दुर्लक्षित

तीर्थक्षेत्राच्या दर्जाची गावकऱ्यांना प्रतीक्षा

तळेगाव ढमढेरे- टाकळी भीमा येथील नैसर्गिक देणं लाभलेल्या राजण खळग्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. सध्या ते भग्नावस्थेत पडले आहेत. त्याकडे शासनाने लक्ष द्यावे, त्याची निगा राखली जावी, अशी मागणी टाकळी भीमातील गावकऱ्यांनी केली आहे. या स्थळाला पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळाल्यास रोजगारांच्या संधी मिळतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्‍त केली. यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याची गरज आहे.
भीमा नदी पात्रात असलेले रांजणखळगे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. पाषाण खडक त्यावरील पांढऱ्या रंगाचे मिठाचे क्षार, विविध प्रकारचे शंख शिंपले, त्यावरील बारीक तांबडी रेती, चाऱ्यांची हिरवळ, नैसगिक छोटे धबधबे यामुळे येथील वातवरण निसर्गरम्य आणि प्रेक्षणीय आहे.
नदीत असणाऱ्या रांजणखळग्यांचे वैशिष्ट्य म्हणजे खळग्यामधील पाणी खारे आणि बाहेरील पाणी गोड आहे. रांजण खळग्यातील पाणीसाठा बारमाही दिर्घकाळ टिकते. यामुळे शेतकऱ्यांना पाणी मुबलक मिळते. याठिकाणी असणारे कुंड माऊलाई देवी गावातील लोकांचे श्रद्धास्थान आहे. आषाढ महिन्यात मोठ्या प्रमाणात महिला भाविक येतात. परंतू या स्थळाकडे दुर्लक्ष होत आहे. निसर्ग सौंदर्याची देणगी लाभल्याने रांजण खळगे असल्याणे टाकळी भीमा गावास तिर्थक्षेत्र आणि पर्यटनाचा दर्जा मिळावा तसेच येथील रांजण खळग्याची निगा राखण्यासाठी व पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनातर्फे प्रयत्न करण्यात यावे, अशी मागणी पोलीस पाटील प्रकाश करपे व ग्रामस्थांमधून होत आहे. या स्थळाची पाहणी करताना ग्रामपंचायत सदस्य उमेश काळे, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय काळे, वि का सो संचालक मनोज वडघूले,सा.कार्याकर्ते निवास साकोरे, तुषार नरसाळे, पांडूरंग काळे, किसन अवचीते आदी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)