टाकळी कडेवळीत येथे एकाला बेदम मारहाण

श्रीगोंदा, दि. 18 (प्रतिनिधी)- तालुक्‍यातील टाकळी कडेवळीत या ठिकाणी किरकोळ कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमवून संजय विलास शिंदे यांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या मारहाणीत संजय शिंदे यांच्या डोक्‍याला, हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
टाकळी कडेवळीत या ठिकाणी झालेल्या किरकोळ भांडणातून संजय विलास शिंदे यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत संजय शिंदे यांचा हात मोडला असून, त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली आहे. संजय शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गणेश उत्तम कोळेकर, उत्तम हरिभाऊ कोळेकर, नंदा उत्तम कोळेकर (रा. टाकळी कडेवळीत) यांनी पिनू ज्योतिबा श्रीराम, भिमा ज्योतिबा श्रीराम (दोघे रा. कोकणगाव, ता. श्रीगोंदा) यांना बोलावून किरकोळ झालेल्या भांडणावरून संजय शिंदे यांना जबर मारहाण केली. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक डी. आर. पठारे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)