विविध क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्यांना पुरस्कार
टाकळीभान – श्रीरामपूर तालुक्‍यातील टाकळीभान येथे जिल्हास्तरीय कवी संमेलन पार पडले. या वेळी राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले.
येथील ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी लिज्जत पापड उद्योगसमूहाचे कार्यकारी संचालक सुरेश कोते होते. आमदार भाऊसाहेब कांबळे, पंचायत समिती सदस्य वंदना मुरकुटे, विजय बनकर, ग्रामीण कवी पोपट पटारे, डॉ. बाबुराव उपाध्ये, डॉ. अशोक शिंदे, प्रकाश कुलथे, लेखक यशवंत पुलाटे, सरपंच रूपाली धुमाळ, उपसरपंच पाराजी पटारे, बाबासाहेब पवार, मुकुंद हापसे, अर्जुन राऊत, तुषार दाभाडे, देविदास बनकर, अक्षय कोकणे, अनिल गाढवे, मुख्याध्यापक शेळके उपस्थित होते.
सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक, वैद्यकीय, शासकीय सेवा, धार्मिक, अध्यात्मिक, कृषी, सहकार, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. सुरेश कोते यांनी विविध पुरस्कारार्थींचे कौतुक केले. पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याला गती मिळेल. निश्‍चितच त्यांच्या हातून अधिकाधिक चांगले काम होईल, असे ते म्हणाले. चांगले कार्य करणाऱ्यांच्या पाठीवर पुरस्काराची थाप पडली, असे कौतुकोद्‌गार आ. कांबळे यांनी काढले. प्रास्ताविक उपसरपंच पाराजी पटारे यांनी केले. कवयित्री संगीता फासाटे यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)