“टाऊन प्लॅनिंग’नुसार समाविष्ट गावांचा विकास

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून 12 समाविष्ट गावाचा टाऊन प्लॅनिंग (टीपी) स्कीमनुसार विकास केला जाणार आहे. आराखडा व नियोजन करून रस्ते बांधण्यास प्राधान्य दिले जाईल. महापालिकेच्या 19 जानेवारी रोजी होणाऱ्या महासभेसमोर या विषय ठेवण्यात आला आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या मान्यतेनंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रथमच टीपी स्कीमचा स्वीकार करणार आहे. या संदर्भात अहमदाबादच्या एचसीपी कंन्सल्टंटच्या प्रतिनिधींनी चिंचवडच्या ऑटो क्‍लस्टर सभागृहात नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना या संदर्भातील सादरीकरण केले. यावेळी महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, आयुक्त श्रावण हर्डीकर तसेच नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या अंतर्गत शहरातील थेरगाव, चिखली, चिंचवड, चऱ्होली, रावेत, किवळे, पुनावळे, ताथवडे, मामुर्डी, डुडुळगाव, मोशी, बोऱ्हाडेवाडी या 12 भागांचा विकास केला जाणार आहे. त्यामध्ये प्रत्येक विभागात 39 हेक्‍टर ते 391 हेक्‍टर इतक्‍या क्षेत्रफळांचा विकास केला जाणार आहे. शहरातील 30, 50 व 70 टक्के विकास झालेल्या भागांचा प्रथम टप्प्यात निवड करण्यात आली आहे.

गावांचा विकास करताना जागा मालकांवर अन्याय होऊ नये, म्हणून टीपी स्कीमचा वापर होतो. सर्वांकडून समप्रमाणात जागा ताब्यात घेऊन प्रथम रस्ते विकसीत केले जाणार आहे. त्यामुळे सर्व बाधितांना चौकोनी आकाराचे रस्त्याच्या दर्शनी भागात जागा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे त्या भागांचा नियोजनबद्ध विकास होणार आहे. पन्नास टक्के पेक्षा अधिक जागा ताब्यात घेतल्यास त्यांना पूर्वीच्या 1 एफएसआय पेक्षा अधिक एफएसआर मिळणार आहे.

विकासाच्या टक्केवारीवर आराखडा शूल्क
चांगल्या दर्जाचा आराखडा तयार व्हावा, म्हणून एचसीपी कंन्सल्टंटची निवड केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. विकासाच्या टक्केवारीनुसार आराखडा तयार करण्यासाठी शूल्क अदा केले जाणार आहे. त्यानुसार, 30 टक्के विकास झालेल्या भागासाठी प्रति हेक्‍टरसाठी 19 हजार तर 50 टक्केपर्यंत विकास झालेल्या भागात 17 हजार 500 आणि 70 टक्केपर्यंत विकास झालेल्या भागासाठी 21 हजार 500 रूपये प्रति हेक्‍टर शूल्क आराखडा तयार करण्यासाठी दिला जाणार आहे. महासभेच्या मंजुरीनंतर हे काम प्रत्यक्ष सुरू केले जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)