टपोरींनी सपना चौधरीला घेरले

बिग बॉस 11 ची स्पर्धक आणि डान्सर सपना चौधरीचा एक व्हिडीओ मध्यंतरी व्हायरल झाला होता. काही टपोरींनी तिच्या कारला घेरले होते. तिने कार सुरू केली तरी ते कारच्या समोरून बाजूला सरकत नव्हते. सपनाने कार चालवायला सुरुवात केली, तसे हे टपोरी तिच्या कारच्या मागे धावायला लागले. त्यांनी सपनाला उद्देशून घाणेरडे कॉमेंटही करायला सुरुवात केली होती. हे ऐकल्यावर मात्र सपनाने आतापर्यंत दाखवलेला संयम सुटला. तिचा चेहरा लालबुंद झाला. त्यानंतर तिने दाखवलेली प्रतिक्रिया बघून प्रेक्षकांना तिचा अभिमानच वाटायला पाहिजे.

पाठलाग करायला लागलेल्या टपोरींना चुकवण्यासाठी सपनाला आपली कार वेगात चालवायला लागली. पण तिने कार थांबवली असती, तर या टपोरींनी तिच्या कारचे नुकसान केले असते. त्यातही सपनाला उद्देशून या टपोरींनी जे कॉमेंट करायला सुरुवात केली, ते ऐकून सपना भडकलीच. तिने कार थांबवली आणि कारमधून उतरून ती या टपोरींवर जोरात खेकसलीच, “क्‍या त्हारे बापने लाकर दे रखी है गाडी’ हे ऐकल्यावर या टपोरींचे पुरते धाबे दणाणले. सपना चौधरी फॅन क्‍लबच्या माध्यमातून हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे.

-Ads-

सपना कधीही आपले मत अगदी स्पष्टपणे मांडायला कचरत नाही. “मी टू’ अभियानादरम्यान लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या महिलांना तिने खडसावले होते. “मी टू’ हे अभियानच अगदी बकवास आहे. या अभियानाचे आपण कधीच समर्थन करू शकत नाही. टाळी एका हाताने वाजत नाही. दरवेळी चूक केवळ मुलांची किंवा पुरुषांचीच असते, असे नाही. मात्र “मी टू’ अभियानानंतर तसेच वातावरण निर्माण झाले आहे, असे सपना म्हणाली होती.

काही दिवसांपूर्वी आग्रामध्ये सपनाचा डान्स शो एका संस्थेने आयोजित केला होता. मात्र कार्यक्रमाच्या दोन तास आगोदर कार्यक्रमाची परवानगी नाही, असे सपनाला कळवले गेले. भडकलेल्या प्रेक्षकांनी स्टेज आणि सभागृहाची मोडतोड केली होती.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)