टपाल कार्यालयात “आधार’ केंद्र

पिंपरी – मावळ लोकसभा मतदार संघांतर्गत येणाऱ्या एकोणिस विभागीय टपाल कार्यालयात आधार केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राचा लोकार्पण सोहळा चिंचवड येथील मुख्य टपाल कार्यालयात खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी पुणे विभागाचे क्षेत्रीय टपाल अधिकारी अभिजीत बनसोडे, तसेच पुणे क्षेत्रीय पारपत्र अधिकारी अनंत ताकवले, रामदास गायकवाड, के. आर. कोरडे आदी उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या संचार मंत्रालयाच्याद्वारे क्षेत्रीय टपाल कार्यालयामध्ये नागरीकांच्या सोयीसाठी आधार केंद्र सुरू करण्याच्या सूचना मंत्रालयाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहे. त्याच अनुषंगाने मावळ लोकसभेच्या एकोणिस विभागीय टपाल कार्यालयात एकाच वेळी आधार केंद्रांची सुरवात करण्यात आली. यामध्ये चिंचवड स्टेशन, चिंचवडगाव, आकुर्डी, औंध कॅम्प, सी. एम. ई. (दापोडी), दापोडी, कासारवाडी, पिंपरी-चिंचवड प्राधिकरण कार्यालय, पिंपळे गुरव, पिंपरी कॅम्प, पिंपरीगाव, देहु, देहुरोड कॅन्टोमेंट बोर्ड, तळेगाव, तळेगाव स्टेशन, वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा, लोणावळा बाजार या ठिकाणच्या केंद्रांचा समावेश आहे.

खासदार बारणे म्हणाले की, नागरीकांना आधार कार्ड काढण्याबरोबरच त्या मधील त्रुटी देखील दुर करण्यासाठी या सर्व केंद्रांचा उपयोग होईल. टपाल कार्यालयात यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला असून नागरीकांना तत्काळ आधार कार्ड काढण्यासाठी याचा उपयोग होऊन वेळेची बचतही होईल. केंद्र सरकारच्या संचार मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली ही आधार केंद्राची सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन खासदार बारणे यांनी केले.

उत्कृष्ट सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आलेला. के. आर. कोरडे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)