टपऱ्यांवर कारवाई केल्यास आंदोलन – डॉ. बाबा आढाव

पुणे – मार्केटयार्डात गेल्या तीस वर्षांपासून टपरीधारक व्यवसाय करत आहेत. ते नियमितपणे कर भरत असतानाही त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले आहे. मात्र, कारवाई झाल्यास बाजार बंद पाडू, असा इशारा ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी दिला
बाजार समितीच्या आवारात कृषी उत्पन्न बाजार समितीने पथारी, टपरी व्यवसायिकांना दिलेल्या नोटीशीच्या डॉ.बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. त्यावेळी कामगार युनियनचे संतोष नांगरे, तोलणार संघटनेचे हनुमंत बहिरट, पथारी संघटनेचे बाळासाहेब मोरे, शशिकांत नांगरे, गोरख मेंगडे, विलास थोपटे आदी उपस्थित होते दरम्यान बाजार समितीने काढलेल्या पत्रकाची अंमलबजावणी करणार असल्याचे प्रशासक बी.जे. देशमुख यांनी सांगितले.
डॉ आढाव म्हणाले की, बाजार समितीकडून 2 लोकांसाठी 200 लोकांना बेरोजगार केले जात आहे. कारवाई झाल्यास जेलभरो करण्याचा इशारा देखील डॉ आढाव यांनी दिला. शुक्रवारपासून बाजार समितीच्या आवारात उपोषण सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगिले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)