टपरी पेटविली ; दोन बकऱ्यांचा मृत्यू

चिंचवड – किराणा मालाची टपरी असलेली जागा खाली न केल्याच्या रागातून एकाने ती पेटवून दिली. या घटनेत टपरीतील दोन बकऱ्यांचा जळून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 12) पहाटे तीनच्या सुमारास चिंचवडमध्ये घडली.

याप्रकरणी रफिक चॉंदसाहेब शेख (वय-27, रा. अण्णासाहेब मगर झोपडपट्टी, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, जावेद मुसा कुरेशी (वय-36, रा. अण्णासाहेब मगर झोपडपट्टी, चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-

रफिक शेख यांची चिंचवड येथील अण्णासाहेब मगर झोपडपट्टी पुलाच्या खाली खुशबु किराणा स्टेअर्स नावाची किराणा मालाची टपरी आहे. ही टपरी ज्या जागेत आहे त्या जागेवरुन रफिक आणि जावेद यांच्यात वारंवार वाद होत होते. याच रागातून आरोपी जावेद याने रफिक यांची टपरी पहाटे तीनच्या सुमारास पेटवून दिली आणि पसार झाला. या टपरीमध्ये दोन बकऱ्या होत्या. त्यांचा होरपळून मृत्यू झाला तर दुकानातील फ्रिज आणि इतर साहित्य असे एकूण 54 हजारांचे नुकसान झाले आहे. आरोपी जावेद याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पिंपरी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक पालांडे तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)