टपरी, पथारी, हातगाडीवाल्यांच्या पुनर्वसनाबाबत बैठक

पिंपरी – टपरी, पथारी, हातगाडीवाल्यांना जागा देण्यासाठी ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत चिट्टी काढून काढण्यात आलेला “लकी ड्रॉ’ चुकीच्या पध्दतीने होत असल्याचा आरोप करत टपरी, पथारी, हातगाडी पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे ड क्षेत्रीय कार्यालयातील प्रशासनाला हा “लकी ड्रॉ’ रद्द करावा लागला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील हातगाडीवाल्यांचे पक्‍क्‍या गाळ्यांमध्ये पुनर्वसन करण्यासाठी “लकी ड्रॉ’ काढण्यात येत होता. मात्र, हा “लकी ड्रॉ’ चुकीच्या पध्दतीने होत असल्याचा आक्षेप घेऊन टपरी, पथारी, हातगाडी पंचायतच्या पदाधिकारी, सदस्यांनी हा “ड्रॉ’ उधळून लावला. त्यावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी उद्या सोमवारी (दि. 26) सकाळी अकरा वाजता पिंपरीतील भक्ती कॉम्प्लेक्‍स येथे संघटनेची बैठक आयोजित केली आहे. बाबा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. तरी, या बैठकीला जास्तीत जास्त सदस्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)