टपरी-पथारी धारकांचे पक्‍क्‍या गाळ्यांत पुनर्वसन

पिंपरी – कष्टकरी कामगार पंचायतीच्या मागणीची दखल घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी प्रत्येक प्रभागात “हॉकर्स झोन’ करण्यासाठी जागेचा शोध घेण्याचे आणि यासाठी क्षेत्रीय आधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्याचे आदेश दिले असल्याची माहिती बाबा कांबळे यांनी दिली.

“ड’ क्षेत्रीय कार्यालयात होणारे चुकीचे पुनर्वसन बंद पाडून टपारी, पथारी धारकांचे पक्‍क्‍या गाळ्यांत पुनर्वसन करण्याची मागणी केली होती. याबरोबरच “हॉकर्स झोन’ करण्याची मागणी केली; तसेच या प्रश्‍नावर फेरीवाला समितीची बैठक बोलवावी, असे निवेदन अतिरिक्‍त आयुक्‍त प्रवीण अष्टेकर यांना दिले होते. संघटनेच्या मागणीची दखल घेऊन महापालिकेच्या वतीने फेरीवाला समितीची बैठक घेण्यात आली.

या वेळी टपरी, पथारी, हातगाडी पंचायत अध्यक्ष आणि फेरीवाला समिती सदस्य बाबा कांबळे यांनी चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले पुनर्वसन थांबवून सर्वांचे पक्‍क्‍या गाळ्यांत पुनर्वसन करावे. “हॉकर्स झोन’ करावेत. त्या ठिकाणी विजेची आणि पाण्याची व्यवस्था करावी. हातगाडी धारकांसाठी “स्मार्ट’ पद्धतीने हातगाडी तयार करून हातगाडी धारकांना द्यावी, अशी मागणी केली. तसेच, 2005 पासून टपरी, पथारी, हातगाडी पंचायत लढा देत असून, पंचायतीने दिलेल्या लढ्यामुळे 2007 साली पिंपरी-चिंचवड महापालिकेने देशातील पहिला कायदा केला आहे. याबाबत आम्ही देशभरात हे सांगत आहोत, यामुळे “हॉकर्स झोन’ आणि पक्‍क्‍या गाळ्यांत पुनर्वसन करून देशात आपण आदर्श निर्माण करावा, असे मत बाबा कांबळे यांनी मांडले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मधुकरराव पवळे सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली. या वेळी हे आदेश देण्यात आले आहे. या वेळी अतिरिक्‍त आयुक्त प्रवीण अष्टीकर, सहायक आयुक्‍त विजय खोराटे तसेच क्षेत्रीय अधिकारी या वेळी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)