“टनेल बोरिंग मशीन्स’चे काम सप्टेंबरपासून

एका वेळी चार यंत्रांच्या सहाय्याने काम सुरू करणार


स्वारगेट-बुधवार पेठ मार्गावर दोन्ही बाजुंनी करणार काम


एका दिवसात 6 ते 7.5 मीटरपर्यंत होणार “ड्रिलिंग’

पुणे – भुयारी मेट्रोसाठी टनेल बोरिंग मशीन्स खोदाईचे काम सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र त्या आधी या मशिन्स कोणत्या कंपनीच्या उपलब्ध होणार, याची संपूर्ण माहिती फेब्रुवारीमध्ये मिळणार असल्याचे मुख्य प्रकल्प अधिकारी अतुल गाडगीळ यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी प्रकल्प उपव्यवस्थापक प्रकाश वाघमारे उपस्थित होते.

टनेल बोरिंग मशिन्सचे काम प्रत्यक्षात कसे चालते, याची माहिती व्हिडिओ फीत शुक्रवारी पत्रकार परिषदेत दाखवण्यात आली. 7 ते 8 देश अशाप्रकारचे मशीन्स बनवतात. या पैकी कोणत्या कंपनीच्या मशीन्स घ्यायच्या आहेत, याचा निर्णय फेब्रुवारीपर्यंत होईल. त्यानंतर त्या मागवून, त्याची जुळणी होऊन प्रत्यक्ष कामाला सप्टेंबरपर्यंत सुरूवात होणार असल्याचे गाडगीळ यांनी नमूद केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्वारगेटकडून बुधवार पेठ आणि बुधवार पेठ ते स्वारगेट अशा दोन्ही बाजूने एकाच वेळी काम करण्यात येणार आहे. यासाठी एकावेळी चार मशीन्सच्या सहाय्याने हे काम करण्यात येणार आहे. या मशीन्सच्या सहाय्याने प्रतिदिन सुमारे 6 ते 7.5 मीटर काम होऊ शकणार असल्याचे गाडगीळ यांनी सांगितले.

“जिओ टेक्‍निकल इन्व्हेस्टिगेशन’ करणार
या मशीन्स दगड आणि याच्या समोर येणाऱ्या सगळ्याच गोष्टींचा अक्षरश: भुगाच करते. त्यामुळे भूगर्भात एखादी मेटल सदृश वस्तू आहे का, किंवा दगड, माती व्यतिरिक्त कोणती गोष्ट आहे का, याची पाहणी आधीच “जिओ टेक्‍निकल इन्व्हेस्टिगेशन’ ने केली जाणार आहे. त्यानंतरच त्या मार्गाचे काम पुढे केले जाणार असल्याचे गाडगीळ यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)