टकला सापडला; दाऊदचे काय? (भाग- 2 )

टकला सापडला; दाऊदचे काय? (भाग- १ )

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आरोपींच्या पासपोर्टवर कोणताही शिक्का न मारता कराची विमानतळापर्यंत त्यांना पोहोचविणे तसेच तेथून दुबईला नेण्याची जबाबदारी टकलावर होती. याच कारणामुळे कराची आणि दुबईदरम्यान आरोपींना केलेल्या प्रवासासंबंधीचे पुरावे तपास यंत्रणांना मिळू शकले नव्हते. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या स्फोटांमध्ये कमीत कमी 257 लोकांचा मृत्यू झाला होता तर 82 कोटी रुपयांच्या संपत्तीचा चक्काचूर झाला होता.

स्फोटांनंतर लगेच मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम आणि अन्य साथीदार दुबईला पळून गेले होते आणि तेथून ते पाकिस्तानात गेले. दाऊदविरुद्ध भारताने उघडलेल्या मोहिमेला अखेर 2003 मध्ये अमेरिकेने मान्यता दिली होती. अमेरिकेच्या वित्त विभागाने दाऊदला त्यावेळी अल्‌ कायदाशी संबंध असलेला दहशतवादी घोषित केले होते. अमेरिकेकडून त्याच्यावर निर्बंधही घातले होते. पाकिस्तानने दाऊदला आश्रय दिला आहे, या भारताच्या दाव्याला पुष्टी देऊन अमेरिकेच्या वित्त विभागाने जाहीर केले होते की, दाऊद कराचीत आहे आणि त्याच्याकडे पाकिस्तानचा पासपोर्ट आहे.

टकलाप्रमाणेच गेल्या 16 वर्षांत विविध देशांशी गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणाचे करार करून आतापर्यंत 63 गुन्हेगारांना भारतात आणण्यात आले आहे. यात छोटा राजन, अबू सालेम यांच्यासारख्या कुख्यात गॅंगस्टरचा आणि अनुप चेतिया याच्यासारख्या उल्फा दहशतवाद्याचाही समावेश आहे. नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून ब्रिटनमध्ये फरार झालेल्या विजय मल्ल्याला आणण्यात भारताला यश आले, तर प्रत्यार्पणाच्या माध्यमातून भारतात आणला जाणारा तो 64 वा आरोपी ठरेल.

2009 मध्ये पाच आरोपींना, तर 2010 आणि 2011 मध्ये प्रत्येकी एका आरोपीला भारतात आणण्यात यश आले. 2012 मध्ये विविध खटल्यांमधील दोन आरोपींना आणण्यात आले, तर निखिल प्रकाश शेट्टी, अशोक धर्माप्पा देवादिका आणि अब्दुल सत्तार ऊर्फ मंजूर या तिघांना भारतात आणण्यात आले. 2014 मध्ये 2 तर 2015 मध्ये पाच आरोपींना भारतात आणण्यात यश आले. या आरोपींवर खून, संघटित गुन्हेगारी, अपहरण, खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 2015 मध्येच छोटा राजनही भारताच्या ताब्यात आला.

2016 मध्ये चार जणांना परदेशातून भारताने ताब्यात घेतले. यावर्षी परदेशातून भारतात आणण्यात आलेला फारुख टकला हा पहिला आरोपी आहे. प्रत्यार्पणाचे करार विविध देशांबरोबर केल्यामुळे 2002 पासून बऱ्याच आरोपींना भारतात आणण्यात यश आले असून, आता मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दाऊद, टायगरसह मुख्य आरोपी आणि मोठे आर्थिक गुन्हे करून फरार झालेले आरोपी कधी ताब्यात येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)