टंचाई परिस्थितीशी सामना करण्यासाठी काटेकोर नियोजन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  सिंचन योजनांची कामे वेळेत झाल्यास सांगली जिल्ह्याचा कायापालट 
सांगली(प्रतिनिधी): सांगली जिल्ह्यात उपसा सिंचन योजनांची कामे समाधानकारक असून बळीराजा जलसंजिवनी प्रकल्पांतर्गत टेंभू उपसा सिंचन योजना, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत कामेही चांगली झाली आहेत. सिंचन योजनांमधील कामे जलद गतीने पूर्ण झाल्यास सांगली जिल्ह्याचा लवकरच कायापालट होईल, असे सांगून टंचाई परिस्थितीशी सामना करण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या योजना प्राधान्याने पूर्ण कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सांगली जिल्ह्यातील पर्जन्यमान, पिकपाणी व राज्य शासनाच्या प्राधान्य क्रमाच्या योजनांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात घेतला. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना अत्यंत अभूतपूर्व अशी आहे. यामधील योजना लहान-लहान असल्याने त्वरीत पूर्ण होवू शकतात. या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील 53 योजना पूर्णत्वास येत आहेत. 306 योजनांना मान्यता व निधी उपलब्ध करून दिला आहे. डिसेंबरपर्यंत सर्व योजनांच्या कामाचे कार्यारंभ आदेश दिले जातील असे नियोजन करा व प्राधान्याने या योजना पूर्ण करा. यामुळे टंचाईसदृस्य परिस्थितीवर मात करणे शक्‍य होणार आहे.
टेंभू योजनेचा सर्वात जास्त फायदा सांगली जिल्ह्याला होणार आहे. या योजनेचा डिसेंबरपर्यंत चौथा टप्पा, तर मार्चपर्यंत पाचवा टप्पा पूर्ण करण्यात येईल. जूनपर्यंत 25 हजार हेक्‍टर जमिन या योजनेतून तर कृष्णा कोयना उपसा सिंचन योजनेतून 25 हजार हेक्‍टर अशी 50 हेक्‍टर जमिन ओलिताखाली आणण्याचे नियोजन आहे. गेल्या तीन वर्षात टेंभू योजनेचे काम 30 टक्‍क्‍यांवरून 90 टक्‍क्‍यांवर आणले आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेत कर्जाची हमी शासनाने घेतली आहे. त्यामुळे बॅंकांनी प्रकरणे मंजूर करून अर्थसहाय उपलब्ध करुन द्यावे. जिल्ह्यात आतापर्यंत 2751 अर्ज प्राप्त असून 2020 लाभार्थ्यांना एलओआय प्राप्त झाला आहे. गरजूंना उद्योगासाठी प्राधान्याने कर्ज द्यावे असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी बॅंकांनी कामगिरी उंचावण्याची आवश्‍यकता व्यक्त केली.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)