टंचाई आराखड्यासाठी 97 लाख 30 हजार रुपये निधी मंजूर

भोर तालुक्‍यातील 14 गावच्या वाड्या-वस्त्यांचा समावेश

भोर- तालुक्‍यातील बहुतांश भागात गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने येत्या काही महिन्यांत दुष्काळाशी सामना करावा लागणार आहे. पाणी टंचाईचे मोठे संकट ओढवण्याची शक्‍यता असल्याने तालुक्‍यातील टंचाईग्रस्त गावांना 97 लाख 30 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे सदस्य रणजीत शिवतरे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे.
शिवतरे यांनी म्हटले आहे की, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत ऑक्‍टोबर ते डिसेंबर 2018 पर्यंतचा पाणी टंचाई निवारणार्थ कृती आराखडा प्राप्त झाला असून सदरचा आराखडा मंजूर करुन पुढील कार्यवाहीसाठी विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. मंजूर टंचाई आराखड्यातील न.पा.पु.यो. विशेष दुरुस्ती करण्याच्या कामांसाठी शिंद, महुडे खु., माळवाडी, जयतपाड (विचारे वस्ती), रायरी (धारांबे वस्ती), सांगवी (वेळवंड खोरे), वाठार हि. मा., कांबरे खुर्द (खुळे वस्ती), उंबार्डे आणि शिळींब या 11 गावांचा समावेश करण्यात आला आहे. तात्पुरती नळपाणी योजनेसाठी महुडे खुर्द (गोरे वस्ती), महुडे बुद्रुक (हुंबे वस्ती) आणि शिरवली या तीन गावांचा समावेश असून या दोन्ही मिळून एकूण 14 गावांसाठी 97 लाख 30 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)