टंचाईग्रस्त गावांत पाणी पुरवठा योजना

7 हजार 952 कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी

मुंबई – महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेला शुद्ध पाणी मिळावे, यासाठी टंचाईग्रस्त प्रत्येक गावात पाणी पुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी 7 हजार 952 कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजूरी देण्यात आली आहे, अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यातील पाणीपुरवठा सुयोग्यरितीने होण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून 10 हजार 583 गावांच्या 6 हजार 624 योजना पूर्ण करण्यासाठी 7 हजार 952 कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. मागील 4 वर्षामध्ये 5 हजार 500 कोटी रुपये खर्च करुन सुमारे 6 हजार 500 योजना पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. या 4 वर्षाच्या कालावधीत पाणी पुरवठा विभागाला चांगलीच गती देऊन राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, भारत निर्माण योजना या योजनांमध्ये अपूर्ण असलेल्या योजनांना पूर्ण करण्यावर भर दिला. वेळप्रसंगी जिल्हा स्तरावर कित्येक पाणी समित्यांवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करुन शासनाच्या निधीचा योग्यरित्या वापर होईल याची चोख दखल घेतल्याचे लोणीकर यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्याच्या 9691 गावे/वस्त्यांसाठी नवीन 6 हजार 53 योजना राबविण्यात येणार असून त्यासाठी 6 हजार 686 कोटी रुपये खर्च करण्यात येतील. नवीन व चालू असणाछया अशा एकूण 10 हजार 583 गावे/वाड्यांसाठी 6 हजार 624 योजनांसाठी एकूण रु. 7 हजार 952 कोटीचा आराखडा अंतिमत: मान्य करण्यात आलेला आहे. याद्वारे महाराष्ट्रातील टॅंकरग्रस्त असणाऱ्या प्रत्येक गावासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे, असेही लोणीकर यांनी सांगितले.

असा देणार निधी …
– कोकण विभाग – 1942 गावांसाठी 954 योजना प्रस्तावित , 570 कोटी रुपयांचा निधी
– पुणे विभाग – 2621 गावांसाठी 1712 योजना प्रस्तावित, 1 हजार 796 कोटी रुपयांचा निधी
– नाशिक विभाग – 1731 गावांसाठी 898 योजना प्रस्तावित, 1 हजार 584 कोटी रुपयांचा निधी
– औरंगाबाद विभाग – 1593 गावांसाठी 1214 योजना प्रस्तावित, 1 हजार 251 कोटी रुपयांचा निधी
– अमरावती विभाग – 1187 गावांसाठी 716 योजना प्रस्तावित, 1 हजार 99 कोटी रुपयांचा निधी
– नागपूर विभाग – 617 गावांसाठी 559 योजना प्रस्तावित, 420 कोटी रुपयांचा निधी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)