झोपेने घेतला तरुणाचा बळी

लोणी काळभोर-कामासाठी उत्तरप्रदेश येथून गोवा येथे रेल्वेने निघालेला तरूण झोपेच्या तंद्रीत दरवाजातून खाली पडून रेल्वे खाली आल्याने मृत्युमुखी पडला असल्याची दुर्दैवी घटना आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास कुंजीरवाडी गावच्या हद्दीत घडली.
सुभाषसिंग श्रीहवालदारसिंग यादव (वय 18) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ राजेशसिंग यादव (वय 19, रा. गौसपूर, ता. मुवअमदाबाद, जि. गाजीपूर, उत्तरप्रदेश) याने फिर्याद दिली आहे. बुधवारी (दि. 16 मे ) मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास बक्‍सर रेल्वे स्थानकावरून मयत सुभाषसिंग, भाऊ राजेशसिंग, ब्रिजेशसिंग चुलत भाऊ पवनसिंग व मित्र दिपक चौधरी यांचेसमवेत पटना – पुणे एक्‍सप्रेसने गोवा येथे एका बिल्डींगमध्ये बिगारीकाम करण्यासाठी निघाले होते. गर्दीमुळे बसण्यासाठी आसनावर जागा न मिळाल्याने हे पाचही जण दरवाजानजीक असलेल्या मोकळ्या जागेत बसले होते. ही रेल्वे आज गुरूवार (17 मे) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास कुंजीरवाडी गावच्या हद्दीत आली. त्यावेळी सुुुभाषसिंग व ब्रिजेशसिंग हे दोघे दरवाजात बसले होते. यावेळी सुभाषसिंग झोपी गेला होता. झोपेत त्याचा तोल गेला आणि पडून रेल्वेखाली आल्याने जागीच मृत्यूमुखी पडला. घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी गेले. मृतदेह उत्तरीय तपासणी साठी ससून रुग्णालयात नेला. त्यानंतर मृतदेह त्याच्या भावाच्या ताब्यात देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)