लोडशेडिंगविरोधात राष्ट्रवादी करणार ‘कंदील’ आंदोलन

लोडशेडिंग असलेल्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या महिला झोपलेल्या सरकारला जागं करणार …

मुंबई: लोडशेडींगमुळे (भारनियमन) राज्यातील जनता हैराण झाली असून याविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी लोडशेडिंग (भारनियमन) आहे त्या ठिकाणी १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता ‘कंदील’ आंदोलन करण्यात येणार आहे.

-Ads-

शिवाय युवक संघटनेच्या वतीने एमएसईबी(MSEB) च्या कार्यालयांसमोर तीव्र आंदोलन करून निषेध नोंदविला जाणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी दिली.

राज्यामध्ये दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांना सहन कराव्या लागत असतानाच आता वीजवितरण महामंडळाकडून लोडशेडिंग (भारनियमन) केले जात असल्याने सर्वसामान्य जनता पुरती बेजार झाली आहे. राज्यातील जनतेच्या समस्यांसाठी सरकारविरोधात आक्रमकपणे लढत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता लोडशेडिंगच्याविरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.

राज्यात ज्या ज्याठिकाणी लोडशेडिंग (भारनियमन) सुरू आहे त्या त्याठिकाणी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या ‘कंदील’ आंदोलन करणार आहेत. शिवाय राष्ट्रवादीची युवक संघटना MSEB च्या कार्यालयांसमोर वैध मार्गाने आंदोलन करून जाब विचारणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या अनोख्या आंदोलनाकडे सगळयांचे लक्ष लागले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)