झोपडीधारकांना मिळणार “सशुल्क घरे’

“सशुल्क घरे’


दहा वर्षांच्या आत घर विकता येणार


पुण्यासह पिंपरी-चिंचवड, मुंबई, ठाणे क्षेत्रात योजना लागू

मुंबई – पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आता 1 जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 पर्यंतच्या अपात्र झोपडीधारकांना आता एसआरए अंतर्गत सशुल्क घरे दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे या झोपडीधारकांना हे मिळालेले घर 10 वर्षांच्या आत विकता येणार आहे. मुंबईसह ठाणे, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील झोपड्यांनाही ही योजना लागू करण्यात आली आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेनुसार 2000 पर्यंतच्या झोपड्यांना पुनर्विकास करून मोफत घर दिले जाते. मात्र मुंबईत 2000 ते 2011च्या काळात सुमारे साडेतीन लाख झोपड्यांमध्ये राहणाऱ्या 18 लाख झोपडीवासीय राहतात. एसआरए योजनेत घरे तुटल्यानंतर या झोपडीवासीयांच्या घरांचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्यांना आता सशुल्क घर दिले जाणार आहे. या घरांची किंमत ही त्या-त्या भागातील प्रकल्पाच्या खर्चानुसार एसआरएचे सीईओ ठरवणार आहेत.

ठळक वैशिष्टे…
– झोपडीधारकांना 2001 ते 2011 या कालावधीतील पुरावा सादर करावा लागणार आहे.
– या कालावधीतील झोपडी अन्य कुणी व्यक्तीने घेतली असल्यास संबंधित व्यक्तीला 2011 नंतर आतायर्पंतच्या वास्तव्याचा पुरावा द्यावा लागणार आहे.
– एसआरए योजना सुरू असलेल्या ठिकाणी जागा उपलब्ध नसल्यास त्याच परिसरातील अन्य योजनांतही या झोपडीधारकांना सशुल्क घर दिले जाणार आहे.
– कुटुंबाव्यतिरिक्त अन्य व्यक्तीच्या नावावर ते हस्तांतरित झाल्यानंतर संबंधित व्यक्ती सवलतीच्या दराने सदनिका घेण्यास भविष्यात पात्र ठरणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)