झोपडपट्टीतील नागरिकांच्या पुनर्वसनाची मागणी

पिंपरी –पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टयांमध्‌ये राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करण्याची मागणी एपीआय जनआंदोलन संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी पिंपरी कॅम्प ते महापालिका मुख्यालयापर्यंत मोचा काढण्यात आला होता. यामध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट शहरात समावेश झाल्यानंतर कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. याशिवाय स्थापत्य विभागाच्या वतीनेदेखील शहरात विविध ठिकाणी मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. शहरातील पात्र झोपडपट्टीधारकांसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. मात्र, शहरातील सर्वच झोपडपट्टीधारकांना यात हक्काचे घर मिळणार नाही. त्यामुळे हा एक मोठा घटक वंचित राहणार आहे. त्यामुळे शहरातील झोपडपट्टीधारकांचे सर्वेक्षण करून, या सर्व झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याची मागणी या निवेदनात केली आहे.

-Ads-

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले असून, या घटकाचा गांभिर्याने विचार करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली आहे, अशी माहिती संजय पाटील यांनी दिली. या शिष्टमंडळात संजय पाटील, राहूल कांबळे यांचा समावेश होता.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)