झोन बदलासाठीच्या शुल्कात कपात

गावठाण हद्दीत रेडी रेकनरच्या 15 टक्‍केच शुल्क भरावे लागणार


शासनाच्या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा


तीस टक्‍के शुल्काला प्रतिसाद मिळत नसल्याने निर्णय


शेती अथवा ना-विकास झोनमध्ये बदल

पुणे – गावठाणाच्या हद्दीलगत असलेल्या शेती अथवा ना-विकास या झोनमध्ये बदल करून रहिवासी झोनमध्ये रुपांतर करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात शासनाने निम्याने कपात केली आहे. त्यानुसार आता गावठाण हद्दीलगत रहिवासी झोनसाठी रेडी रेकनरच्या 30 टक्‍क्‍यांऐवजी 15 टक्‍केच शुल्क भरावे लागणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

राज्य शासनाकडून संबंधित गावाचे गावठाण जाहीर करण्यात येते. त्यासाठीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येते. अधिसूचना प्रसिद्ध करण्यापूर्वी भूमिअभिलेख विभागाकडून त्या गावाची अथवा वाडीची मोजणी करण्यात येते. त्यानंतर गावठाण हद्दीचा नकाशा करण्यात येतो. त्यामुळे त्या गावातील जमिनी या निवासी झोनमध्ये येतात. 1920- 1930 दरम्यान ब्रिटिश सरकारने अशा प्रकारे पुणे जिल्ह्यात सुमारे 1300 ते 1400 गावे महसुली गावे म्हणून निश्‍चित करण्यात आली होती. परंतु, गेल्या अनेक वर्षांत या गावांच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तसेच नव्याने देखील काही गावांचे गावठाणे जाहीर करण्यात आली आहेत.

-Ads-

वाढत्या लोकसंख्येमुळे अशा गावठाणांच्या हद्दीबाहेरील बाजूस मोठ्या प्रमाणावर बांधकामे होत आहेत. बांधकाम करताना शेती विभागाचे रुपांतर रहिवासी विभागात करून घेणे बंधनकारक आहे. परंतु, अनेकदा ते केले जात नाही. त्यामुळे अशी बांधकामे अनधिकृत ठरत आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने गावठाणाच्या हद्दीबाहेरील शेती विभागाचे निवासी विभागात रुपांतर करण्यासाठी रेडी-रेकनरमधील शेती दराच्या तीस टक्‍के शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परंतु, हे शुल्क जास्त असल्याने त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. हे लक्षात आल्याने शुल्काच्या दरात निम्म्याने कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

एकसमान धोरण आखण्याची होती मागणी
राज्यातील विविध जिल्ह्यांत गावठाणालगत झोन बदलासाठी वेगवेगळे शुल्क होते. त्यामुळे लोकप्रतिनिधी यांच्याकडूनही संपूर्ण राज्यात याबाबत एकसमान धोरण आखण्याची मागणी होत होती. या सर्व पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने गावठाण हद्दीलगतच्या ठराविक अंतरापर्यंतच्या क्षेत्राचे रहिवासी झोनमध्ये रुपांतर करण्यासाठी रेडी-रेकनरच्या 15 टक्‍के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

गावठाणलगतच्या क्षेत्रांना फायदा
जिल्ह्यात गावठाणांची संख्या सुमारे 1 हजार 900 आहे. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील या गावठाणलगतच्या क्षेत्रांना फायदा होणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)